Water supply esakal
पुणे

Water Supply : खराडी भागातील एक दिवसाआड पाणी पुरवठा बंद

पुणे महापालिकेने खराडी भागात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेने खराडी भागात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याविरोधात प्रचंड रोष निर्माण झाल्याने अखेर महापालिकेने हा निर्णय मागे घेतला आहे. या भागात आता शहरातील इतर भागाप्रमाणे दर गुरुवारी पाणी बंद असणार आहे.

धरणातील पाणी साठा कमी झाल्याने महापालिकेने पाणी बचतीसाठी दर गुरुवारी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी करताना खराडी, चंदननगर, मथुरानगर, संघर्ष चौक, वृंदावन सोसायटी, चौधरी वस्ती, सातववस्ती, गुलमोहर, शंकरनगर, गणपती सोसायटी, बराटेवस्ती, थिटे नगर, पाटील बुवानगर सितारा बेकरी, साई पार्क, शेजवल पार्क, साईबाबा मंदिर यासह इतर भागातील पाणी पुरवठा विस्कळित झाला.

ज्या भागातील पाणी पुरवठा व्यवस्थित होता, तेथे एक दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे पाणी पुरवठा विस्कळित झाला. याविरोधात नागरिकांनी, राजकीय पक्षांनी आंदोलने केली. त्यामुळे अखेर या भागातील एक दिवसाआड पाणी पुरवठा रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘खराडी भागातील एक दिवसा आड पाणी पुरवठ्याचे नियोजन हे प्रायोगिकतत्वावर होते. पण त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्याने हा निर्णय मागे घेतला आहे. शुक्रवारपासून या भागात नियमीत पाणी पुरवठा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT