कात्रज : रामभाऊ म्हाळगी शाळेलगतच्या परिसरात असलेल्या पाण्याच्या धोकादायक टाक्या प्रशासनाकडून पाडण्यात आल्या आहेत. त्यानंतर या जागेत नव्याने पाण्याची एक मोठी टाकी बांधण्याची मागणी राजस सहकारी सोसायटीने केली आहे. २३८ बंगल्यांच्या राजस सोसायटीची स्थापना १९७० साली २३ एकर क्षेत्रावर झाली. या गृहनिर्माण संस्थेच्या अॅमीनिटी स्पेसमध्ये पाणी साठवणुकीसाठी टाक्या बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनच्या जलप्राधिकरण विभागास जागा देण्यात आली होती.
कात्रज ग्रामपंचायत ही महानगरपालिकेमध्ये विलीन झाल्यानंतर, सदर पाणी साठवणुक टाक्या या पुणे महापालिकेकडे हस्तांतरित झाल्या. मात्र, काही काळानंतर पाणी पुरवठा विभागाकडून या टाक्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले व त्या पाणीसाठवणूकीसाठी उपयुक्त नसल्याचे समजले. या टाक्या धोकादायक असल्याचे समोर आल्यानंतर पाडण्यात आल्या आहेत.
राजस सोसायटी परिसरास केदारेश्वर टाकीमधून पाणीपुरवठा केला जातो. परंतु, वितरण क्षेत्रामध्ये पाणी साठवणूक टाक्या नसल्याने तचेस लोकसंख्या प्रचंड वाढल्याने राजस सोसयटी सभासद व परीसरातील गृहनिर्माण सोसायट्यांना कमी वेळ, कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक पाणी समस्येने त्रस्त आहेत. या दोन टाक्यांऐवजी, एक दहा लाख लिटर क्षमतेची टाकी या टाक्यांच्या जागी बांधण्यात यावी, अशी मागणी सोसायटीने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली असून तसे पत्र कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.
सदर जागा ही राजस सोसायटीच्या मालकीची असून त्यांचा अकृषक कर महसूल खाते, महाराष्ट्र शासन यांच्याकडे सोसायटी भरत आहे. नवीन टाकी बांधल्यामुळे सोसायटी व परिसरातील सर्व नागरीकांचा पाणी पुरवठ्यासंदार्भातील त्रास कमी होईल.
- हेमंत धायबर, अध्यक्ष राजस सोसायटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.