Pune Municipal Corporation Sakal
पुणे

Water Tax : पुणेकरांनो पाणीपट्टीची थकबाकी न भरल्यास लागणार दंड

पुणे शहरातील व्यावसायिक व काही निवासी मिळकतींना पूर्वीपासून मिटरद्वारे पाणीपट्टीचे बिल पाठविले जात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील व्यावसायिक व काही निवासी मिळकतींना पूर्वीपासून मिटरद्वारे पाणीपट्टीचे बिल पाठविले जात आहेत. पण अनेक वर्षापासून पाणीपट्टी भरण्याकडे नागरिक दुर्लक्ष करत असल्याने आता थकबाकीवर प्रति महिना एक टक्का व्याज लावून दंड वसूल केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपट्टीची थकबाकी भरावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मध्ये आठव्या प्रकरणात कराधान नियम ४१ नुसार थकबाकीवर प्रति महिना एक टक्के दंडात्मक व्याज आकरणाचे अधिकारी महापालिकेला आहेत. पण पुणे महापालिकेतर्फे गेल्या अनेक वर्षापासून थकबाकी वसुलीसाठी दंडात्मक कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.

मात्र आता ३१ जानेवारी २०२४ पर्यंत असणारी थकबाकी भरण्यासाठी नागरिकांना नियमानुसार ६० दिवसांची मुदत दिली जाणार आहे. या मुदतीत थकबाकी भरली नाही तर त्यांच्यावर १ एप्रिल २०२४ पासून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

महापालिकेच्या ३९ हजार ग्राहकांकडे पाणीपट्टीची थकबाकी सुमारे ४५० कोटी रुपये आहे, पण दुबार बिल, मिटर खराब असल्याने चुकीचे बिल जाणे आदी कारणामुळे ही रक्कम फुगली आहे. खरी थकबाकीही २५० कोटीच्या घरात आहे. त्यामुळे ही रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनाने दंडात्मक कारवाईस सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेकडून सर्व ग्राहकांना बिल देण्याची व्यवस्था केली आहे. जर बिल मिळाले नाही तर ३१ जानेवारी पर्यंत लष्कर पाणी पुरवठा विभाग, स्वारगेट, एसएनडीटी, चतुःश्रृंगी पाणी पुरवठा विभाग कार्यालयातून बिल घेऊन जावे. थकबाकी ३१ मार्चपूर्वी जमा करावी असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT