शिवाजीनगर - जंगली महाराज रस्त्यावर, हॉटेल न्यु सेंट्रल रेस्टॉरंट समोर आठ ते दहा दिवसापासून रस्त्यावर पाणी वाहत असल्याने स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना फोनवर कल्पना देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष केल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.
रहिवाशांनी आधिकाऱ्यांबद्दल नाराजी बोलून दाखवली व तीव्र संताप व्यक्त केला. नागरिकांनी अनेकवेळा अधिकाऱ्यांना सांगून देखील दखल घेतली जात नसल्याचे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. रहिवाशांनी सातत्याने अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यावर अखेर मंगळवार (ता. ३०) दुपारी अडीच वाजता ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी येऊन पदपथ फोडून ठेवला.
'अनेक दिवस झाले दुकानासमोर पाणी वाहते आहे. त्यामुळे नागरिकांना चालणे देखील मुश्किल झाले आहे. सातत्याने पाणी वाहत असल्याने पाण्याची दुर्गंधी येते. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन काम करायला हवे.
- सचिन वडघुले, शिवाजीनगर गावठाण
ठेकेदाराचा हलगर्जीपणा
'जलवाहिनी फुटलेल्या जागेवर (पदपथावर) ठेकेदाराने खडड्डा खोदून ठेवला. जंगली महाराज रस्त्यावर रहदारी असल्याने त्या ठिकाणी सुरक्षेसाठी बॅरिकेड्स लावण्यात आले नाहीत. त्यामुळे पदावरून पादचाऱ्यांना चालणे देखील मुश्कील झाले होते. खड्डा खोदून काढलेला राडारोडा तसाच पदपथावर पडून होता.
'आम्ही अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगून देखील ते दुरूस्तीसाठी आले नाहीत. वेळेत अधिकारी न आल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेले. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मंगळवारी काही कर्मचाऱ्यांनी येऊन खड्डा खोदला. तक्रार करून देखील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. पदपथावर खड्डा खोदल्याने पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले.
- रमेश पाटील, सचिन कोदरे, रहिवासी शिवाजीनगर
'मुख्य जलवाहिनी फुटली असल्याने पाणी वाहत आहे. पाहणी करून जलवाहिनीचे काम करण्यासाठी कर्मचारी पाठवले आहेत. सिमेंट कॉंक्रीट फोडण्यासाठी वेळ लागतो. आज दिवसभरात काम होईल.
- सुभाष खिलारे, कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.