We will Solve the problems of the workers in the city says girish bapat 
पुणे

शहरातील कामगारांचे प्रश्‍न तडजोडीने सोडवू - गिरीश बापट

रवींद्र जगधने

पिंपरी (पुणे) - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कामगार प्रलंबित प्रश्‍नाबाबत न्यायालयात गेले आहेत. मात्र, त्यासंदर्भात पुढील महिन्यात बैठक घेऊन तडजोडीने कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यात येतील, असे आश्‍वासन अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी थेरगाव येथे दिले. 

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघातर्फे थेरगाव येथील शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन बांधण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन बापट यांच्या हस्ते झाले. महापौर नितीन काळजे, खासदार श्रीरंग बारणे व अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप व अॅड. गौतम चाबुकस्वार, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत झिंजुर्डे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, क्रिडा सभापती लक्ष्मण सस्ते, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता तापकीर, जैवविविधता समिती सभापती उषा मुंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेनेचे शहराध्यक्ष योगेश बाबर यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. 

बापट म्हणाले, "परदेशात कामगार संप करत नाहीत तर उपाशी राहतात. काळ्या फिती लावतात. मत परिवर्तन करण्याचे प्रयत्न करतात. मात्र, आपल्याकडील डाव्या आघाडीच्या कामगार संघटना तसे करत नाहीत. त्यामुळे देशात व राज्यात हजारो कारखाने बंद पडले असून उत्पादन थांबले आहे.'' 

खासदार साबळे म्हणाले, "महापालिकेत कायमस्वरूपी कामगारांपेक्षा मानधनावरील कर्मचारी जास्त आहेत. पिंपरी-चिंचवड शहराचे वैभव हे कामगारांच्या घामातून निर्माण झाले आहे. त्यामुळे कामगारांच्या हिताचा विचार होणे गरजेचे आहे.'' शशिकांत झिंजुर्डे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. हनुमंत लांडगे यांनी आभार मानले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT