राज्यात हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे, हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.
राज्यातील काही भागांतील वातावरणात मोठा बदल झाला आहे.दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण दिसून येत आहे. तर पहाटेच्या सुमारास शहरातील काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. हडपसर, लोणी काळभोर तसेच पुणे ग्रामीण परिसरात पावसाने हजेरी लावली.
मध्य महाराष्ट्रातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल,तर काही भागात गारपीट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे वाढलेला उन्हाचा चटका कमी होईल. दरम्यान, पुणे शहरात दुपारनंतर अजून हलका पाऊस,तर काही भागांत गारपीट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
बंगालच्या उपसागरावरून येणारऱ्या आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे पुढील तीन ते चार दिवसांत कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि मराठवाडा, विदर्भातील काही भागांत विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे.
(Rain in Pune! Unseasonal weather will hit the state again; Rain and hail warning in these districts)
राज्यातील छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, सातारा, जालना, ठाणे रायगड आणि नंदूरबार जिल्ह्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.