weather update maharashtra rainy season Monsoon in konkan Vengurla and whole Goa keral pune sakal
पुणे

मॉन्सून तळकोकणात दाखल; संपूर्ण गोवा व्यापून वेंगुर्ल्यापर्यंत मजल

केरळमध्ये वेळेआधी दाखल झाल्यानंतर मॉन्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनाची प्रतीक्षा संपली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केरळमध्ये वेळेआधी दाखल झाल्यानंतर मॉन्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनाची प्रतीक्षा संपली आहे. शुक्रवारी संपूर्ण गोवा राज्य व्यापून तळ कोकणाच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेल्या वेंगुर्ल्यापर्यंत मॉन्सूनने मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. दोन दिवसांत दक्षिण महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

यंदा नियमित वेळेच्या तीन दिवस आधीच (२९ मे) मॉन्सूनचे देवभूमी केरळमध्ये आगमन झाले. त्यानंतर दोनच दिवसांत मॉन्सूनने संपूर्ण केरळ राज्य, कर्नाटक किनारपट्टी व्यापून गोव्याच्या किनाऱ्यापर्यंत मजल मारली. त्यानंतर दोन दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता असतानाच मॉन्सूनचा वेग मंदावला. संपूर्ण कर्नाटक किनारपट्टी व्यापून गोव्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या मॉन्सूनने महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी १० दिवसांची वाट पाहायला लावली. २०१९ मध्ये मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास २० जून, तर २०२० मध्ये ११ जून उजाडला होता.

तर गतवर्षी मॉन्सून ५ जून रोजी महाराष्ट्रात पोचला होता. मॉन्सूनने शुक्रवारी (ता. १०) अरबी समुद्रावरून पुढे चाल करत संपूर्ण गोवा, दक्षिण कोकणचा काही भाग, कर्नाटकच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. राज्यात पूर्व मोसमी पावसानेही जोर धरला आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान झाले आहे. उद्यापर्यंत (ता. १२) दक्षिण महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटकचा आणखी काही भाग, संपूर्ण तामिळनाडू, दक्षिण आंध्रप्रदेशासह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मंगळवारपर्यंत (ता. १४) मॉन्सून संपूर्ण कर्नाटक व्यापून महाराष्ट्राच्या आणखी काही भागात पोचण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT