weather update rain forcast bhide bridge closed for transport traffic jam pune  sakal
पुणे

संततधार पावसामुळे शहरभर वाहतूक कोंडी, भिडे पुल बंद केल्याने वाहनचालकांची तारांबळ

पावसाचे पाणी, खड्डे, रस्त्यावर आलेल्या खडीमुळे वाहनचालक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शाळा, महाविद्यालये, नोकरीला जाण्याच्या वेळेलाच बुधवारी सकाळी जोरदार पाऊस झाल्याने अनेक नागरीकांना विस्कळीत झालेल्या वाहतुकीचा चांगलाच फटका बसला. ठिकठिकाणी पडलेले खड्ड्यांमुळे वाहतुक मंदावली. त्यातच नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने भिडे पुलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे वाहनचालकांना आणखीनच त्रासाला सामोरे जावे लागले. शहरात मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटेपासून पाऊसाने जोरदार हजेरी लावली. आगोदरच खराब झालेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साठल्यामुळे वाहनचालकांवर वाहने संथगतीने चालविण्याची वेळ आली. मुख्य रस्ते, चौकांमधील सिग्नल यंत्रणा बंद ठेवून वाहतुक पोलिसांकडून वाहतुक नियमन करण्यावर भर दिला जात होता.

मात्र पाऊस, खड्डे व मोठी वाहने मोठ्या संख्येने रस्त्यावर आलेली चारचाकी वाहने, ठिकठिकाणी रस्त्यांवर साठलेले पाणी यामुळे वाहतुक कोंडीमध्ये आणखीनच भर पडत गेली. नागरीक नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धा ते एक तास विलंबाने कामाच्या ठिकाणी पोचले. मुख्य रस्त्यांवरील वाहतुक कोंडीमुळे अनेक चालकांनी अंतर्गत रस्त्यांवरुन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथेही त्यांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागल्याचे चित्र होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळपासून खडकवासला धरणातुन मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास डेक्कन येथील नदीपात्रातील भिडे पुल पाण्याखाली गेल्याने पुल वाहतुकीसाठी बंद करावा लागला.

त्यामुळे बुधवारी सकाळपासूनच कोथरुड, कर्वेनगर, गोखलेनगरहून नारायण पेठेकडे येणाऱ्या वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. वाहनचालकांना खंडोजीबाबा चौक, म्हात्रे पुल, लाल बहादुरशास्त्री रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर परिसराकडून पेठांमध्ये जाण्याची वेळ आली. त्यामुळे आपटे रस्ता, जंगली महाराज रस्ता परिसरातील वाहतुक मंदावली. पावसामुळे मोठ्या संख्येने मोटारी रस्त्यावर आल्याने कोंडीत भर पडली. धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीपात्रातील रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला. त्यामुळे मध्यभागातील केळकर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साठल्यानेही वाहनांचा वेग मंदावला.परिणामी लाल बहादूर शास्त्री रस्ता, टिळक रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, शंकरशेठ रस्ता, स्वारगेट, कर्वे रस्ता, पुणे सातारा रस्ता या परिसरामध्येही वाहतुक विस्कळीत झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : तुम्ही मला निवडलं, अजित पवारांना निवडलं आता युगेंद्र पवारला निवडून द्या - शरद पवार

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT