wedding ceremoney 
पुणे

पुणे : नव्या कोविड निर्बंधांमुळं लग्नाच्या बुकिंग होताहेत रद्द: हॉल मालकांवर संक्रांत!

सकाळ डिजिटल टीम

नव्या कोविड निर्बंधांमुळे पुणे शहरातील लग्नाच्या हॉल मालकांवर बुकिंग रद्द करण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने लग्न कार्यांसाठी २०० लोकांची उपस्थिती बंधनकारक होती. मात्र, सध्या शहरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्यानं वाढायला लागल्याने प्रशासनाने ही मर्यादा पुन्हा ५० लोकांवर आणली आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे. 

पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. दररोज नव्याने २,५०० ते ३००० बाधित रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता नवे नियम लागू केले आहेत.  पुण्यातील वेडिंग हॉल असोसिएशनच्या माहितीनुसार, शासनाच्या नव्या निर्बंधांमुळे विशेषतः मार्च आणि मे या लग्न सराईतल्या काळातील बुकिंग मोठ्या प्रमाणावर रद्द होत आहेत. या क्षेत्राचा वार्षिक टर्नओव्हर २,००० कोटींचा आहे मात्र निर्बंधांमुळे या व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. 

असोसिएशनचे अध्यक्ष श्रीपाल ओसवाल म्हणाले, "लॉकडाउन शिथिल होऊ लागल्यानंतर जानेवारी महिन्यांत लग्नसराईंसाठी हॉलचे बुकिंग होत होते. आता यापुढे परिस्थिती चांगली राहिल अशी व्यावसायिकांना आशा होती. मात्र, आता नव्या निर्बंधांमुळे ग्राहक बुकिंग रद्द करुन जुलैमध्ये बुकिंगासाठी विचारणा करत आहेत. यामुळे लग्नाच्या हॉल मालकांची स्थिती कात्रीत सापडल्यासारखी बनली आहे. 

हडपसर भागातील एक हॉल मालक म्हणाले, आमच्याही क्षेत्राला आता सरकारच्या मदतीची  गरज आहे. खर्च कसा भागवायचा? असा प्रश्न आमच्यासमोर उभा ठाकला आहे. आमच्या अनेक कर्मचाऱ्यांना आम्ही कामावरुन कमी केलं आहे. ग्राहक आता छोटे हॉल आणि कमी बजेटलाच प्राधान्य देत आहेत त्यामुळे आमचं आर्थिक व्यवस्था कोलमडून पडली आहे. सध्या केवळ १० टक्के व्यवसाय रुळावर आला आहे. पण जर पुन्हा लॉकडाउनची घोषणा झाली तर तोही जाण्याची शक्यता आहे. लग्न समारंभासाठी पूरक व्यावसायिक बँड मालक, केटरर्स, डेकोरेशन कंपन्या यांनीही दावा केला आहे की, अनेक ग्राहकांनी कमी लोकांच्या निर्बंधांमुळे आमच्याकडील बुकिंग रद्द केल्या आहेत. 

लग्नसराईसाठी शासनाने पुण्यात लागू केलेले नियम

  1. लग्नासाठी पोलीस परवानगी आणि ५० लोकांची उपस्थिती बंधनकारक
  2. लग्न समारंभात प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक
  3. ऑक्सिमिटर आणि तापमान तपासणीनंतरच प्रत्येकाला हॉलमध्ये प्रवेश बंधनकारक
  4. संपूर्ण परिसर निर्जंतुक करणं बंधनकारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT