रामवाडी - बोलो साईराम, जय जय साईराम या नाम घोषत काल संध्याकाळी सहा वाजता चंदननगर येथे शिर्डीच्या साईबाबांच्या पालखीचे आगमन झाले होते. बाबांच्या नाम घोषात भक्तिमय वातावरणा परिसर न्हावुन निघाला. शिर्डी माझे पंढरपूर मानणारे साईभक्त काल सकाळी पुण्याहून नगररोडच्या दिशेने निघाले. बाबांच्या पालखी समवेत पायी चालणाऱ्या वारकर्यांचे आणि पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले.
चंदननगर येथे साईबाबा मंदिर बाहेर आत सुबक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. फुलांची सजावट करण्यात आली होती.संध्याकाळी ही पालखी चंदननगर येथील साईबाबांच्या मंदिरात आली. केवल अर्धा तास त्या ठिकाणी येत असल्याने दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती .पालखीचे पूजा करण्यात आली.
भजन म्हटले गेले दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी महाप्रसाद लाभ घेतला. तब्बल दोन वर्षानी साईबाबाची पालखी चंदननगर येथे आल्याने सर्वांच्या चेहर्यावर आनंद झळकत होता. माजी नगरसेवक महेंद्र पठारे सह साई मंदिराचे ट्रस्टी श्रीनाथ यादव ,देवेंद्र खवले ,सुदामराव मते, शहाजी उकरिडे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.