Whale vomit 
पुणे

Pune Whale Vomit Smuggled: सोन्यापेक्षा महागड्या व्हेल माशाच्या उलटीची पुण्यात तस्करी; टोळी अटकेत

सकाळ डिजिटल टीम

पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यापेक्षा जास्त भाव असलेल्या व्हेल माशाच्या उलटीची पुण्यात तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी एका टोळीतील चार जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळ असलेल्या या उलटीची किंमत सुमारे ५ कोटी रुपये इतकी आहे. (Whale vomit more expensive than gold is smuggled in Pune four pepole arrested)

पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी अक्षय ठाणगे, विजय ठाणगे, अजीम काजी, नवाज कुडपकर, राकेश कोरडे अशी अटक कलेल्या आरोपींची नावं आहेत. पुण्यातील या टोळीकडून पोलिसांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बाजारभावाप्रमाणं सुमारे ५ कोटी रुपये किंमतीचं जवळजवळ ५ किलो वजनाची उलटी जप्त केली आहे.

आरोपी पुण्यात एका व्यक्तीला हा पदार्थ देण्यासाठी आले होते. डेक्कन पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या चौघांना अटक केली आहे. आरोपी हे मूळचे कोकणातील दापोलीचे रहिवासी असून हा पदार्थ विकण्यासाठी ते पुण्यात आले होते. याचा वापर नेमका कशासाठी केला जाणार होता याचा तपास पोलीस करत आहेत.

हे ही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता..

व्हेल माशाची उलटी इतकी महाग का?

व्हेल माशाच्या शरीरातून अर्थात उलटीतून निघालेला अॅम्बरग्रीस या पदार्थाचा अत्तर किंवा सुगंधित उत्पादनं तयार करण्यासाठी वापर केला जातो. जगभरात उंची अत्तर लाखोंच्या किमतीनं विकलं जातं. त्यात अॅम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) यापासून तयार केलेल्या अत्तराची तर कोट्यवधींना विक्री होते. एवढेच नाही तर अॅम्बरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केलं जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dasara Melava Rally: प्रचार तोफांची आज पहिली सलामी; जाणून घ्या कोणत्या नेत्याचा कुठं होणार दसरा मेळावा

Bagmati Express Accident: मोठा रेल्वे अपघात! वेग 75 किमी, बागमती एक्स्प्रेस मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनमध्ये घुसली; 19 प्रवासी जखमी

Dussehra Melava 2024 Live Updates: विजयादशमीनिमित्त माँ कामाख्या देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

अग्रलेख : अपने अपने रावण!

Dussehra 2024 Wishes: 'वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय..' दसऱ्याच्या प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT