पुणे - पुण्यासह राज्यभरातून चाइल्ड पोर्नोग्राफीची प्रकरणे समोर येत आहे. त्यामुळे मुलांच्या सायबर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुलांमध्ये सायबर सुरक्षेबद्दल जागृतीसाठी रिस्पॉन्सिबल नेटिझमअंतर्गत सायबर ॲलर्ट स्कूलच्या माध्यमातून नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. यात ६५ टक्के मुले सायबर धोक्यापासून अनभिज्ञ आहेत, तर ८१ टक्के मुलांना सायबर सुरक्षेबद्दल ज्ञान नाही.
‘एचडीएफसी परिवर्तन’च्या सर्वेक्षणात सहावी ते दहावीचे २०,००० हून अधिक विद्यार्थी, ५००० पालक आणि ६५० शिक्षक सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांचे सायबर सुरक्षेबाबतचे ज्ञान किती आहे, हे जाणून घेण्यासाठी टेस्ट घेण्यात आली.
‘या’ बदलांवर लक्ष ठेवा
७० टक्के - मुले त्यांच्या वयासाठी कायदेशीर नाहीत असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतात.
६५ टक्के - मुलांना सायबरविश्वातील धोक्यांबद्दल अजिबात माहिती नाही.
८१ टक्के - मुलांना सायबर सुरक्षिततेबद्दल ज्ञान नाही.
५३ टक्के - मुलांना माहीत नाही, की १३ वर्षांखालील मुलांनी सोशल मीडिया अकाउंट उघडू नये.
पोर्न कंटेंट व मुले
इंटरनेटवरील अश्लील कंटेंटबद्दल मुलांना लहान वयातच माहिती मिळते. कुतूहलापोटी मुले व्हिडिओ बघतात अन् बऱ्याचदा त्याचे व्यसन लागते. याचा परिणाम आरोग्य व वर्तणुकीवर होतो.
ऑनलाइन गेम्सबद्दल घ्यावयाची काळजी
योग्य स्क्रीन टाइम
वय वर्षे स्क्रीन टाइम
२ ते ६ दररोज २० मिनिटे
७ ते १२ दिवसातून ३ वेळा २०-२० मिनिटे
१३ ते १६ दिवसातून २ तास
डिजिटल गार्डियनसाठी काय कराल
मूल मोबाईल हाताळताना पालकांनी लक्ष द्यावे. अनेकदा ते मोबाईलवर नेमके काय पाहतात, हेच कळत नाही. त्यामुळे पालकांनी डिजिटल साक्षर होणे गरजेचे आहे.
- डॉ. स्मिता जोशी, समुपदेशक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.