पुणे- सासवड मधील आचार्य अत्रे सभागृहात शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी शिवतारेंनी लहानपणीच्या आठवणी सांगून उपस्थित विद्यार्थ्यांचे चांगलेच मनोरंजन केले. लहानपणी मी खूप मस्तीखोर होतो. चौथीत असताना मी बिड्या प्यायचो. बिडी ओढल्याने चक्कर यायची आणि त्यामुळे मी पडायचो, अशी कबुली त्यांनी दिली आहे.
लगानपणी मी वांड होतो. बंडखोर होतो. चौथीत असताना जनावरं हाकायला जायचो. त्यावेळी आईच्या पिशवीतून पैसे चोरायचो आणि त्याच्या बिड्या खरेदी करायचो. बिडी ओढली की चक्कर यायची, त्यामुळे मी खाली पडायचो. पण, अभ्यास न करता देखील मी शाळेत हुशार होतो, अशी बालपणीची आठवण शिवतारे यांनी सांगितलं.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम होता. त्यामुळे विजय शिवतारे यांनी केलेल्या बेधडक वक्तव्यांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवतारे कार्यक्रमात म्हणाले की, मी लहानपणापासून बंडखोर स्वभावाचा आहे. लहानपणी चौथीत असताना मी बिड्या प्यायचो हे ऐकून कोणाला विश्वास बसणार नाही. पण, हे खरे आहे. गुरं हाकायला जायचो. चालत कुठेही दुरपर्यंत जायतो. पण, अभ्यासात देखील हुशार होतो. मी शाळेत पहिल्या क्रमांकावर होतो.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी विजय शिवतारे चांगलेच चर्चेत आले होते. त्यांनी अजित पवार यांचे टेंशन वाढवलं होतं असं म्हणता येईल. त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शड्डू ठोकला होता. काही झालं तरी अजित पवारांच्या उमेदवाराला पाडणार अशी भूमिका त्यांनी घेतली होती. नंतर त्यांनी काही कारणामुळे माघार घेतली होती.
बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये उभा राहिला असतो, तर दोघांना पाडून विजयी झालो असतो, असं देखील विजय शिवतारे कार्यक्रमात म्हणाले. दरम्यान, बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत झाली. लढतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.