Chakan News sakal
पुणे

Chakan News : चाकण नगर परिषदेला हक्काची जागा कधी मिळणार ?

सकाळ वृत्तसेवा

चाकण : गेली सात वर्षे चाकण नगरपरिषद अस्तित्वात आली परंतु चाकण शहरात मूलभूत सोयी,सुविधा निर्माण झालेल्या नाहीत. अगदी वर्दळीच्या चौकात सुलभ स्वच्छतागृह नाहीत. प्रवाशांनी,नागरिकांनी करायचे काय हा प्रश्न निर्माण होतो आहे. या मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी चाकण नगर परिषदेकडे हक्काची जागा नाही. चाकण नगर परिषदेला कोण जागा देते का जागा हा सवाल निर्माण झाला आहे.

चाकणचे मुख्याधिकारी मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जागा मिळविण्याच्या शोधात आहेत परंतु शासन दरबारी पाठपुरावा करूनही जागा मिळत नाही. जागांचे वाढलेले लाखो रुपयांचे भाव त्यामुळे जागा कशी मिळणार हा एक प्रश्न निर्माण होतो आहे. निवडणुका येतात,जातात प्रश्न निर्माण होतात परंतु ते प्रश्न कोणी सोडवत नाहीत. आश्वासने मिळतात परंतु नागरिकांच्या मूलभूत समस्यांना कोण वाचा फोडणार आहे का?हा ही सवाल निर्माण होतो आहे.

चाकण ता. खेड येथे ग्रामपंचायत रद्द होऊन नगरपरिषद अस्तित्वात आली. गेली सात वर्षे नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात कारभार केला जात आहे. नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर नागरिकांना ज्या प्राथमिक मूलभूत सोयी,सुविधा आहेत त्या सुविधाही मिळत नाही. शहरातील अंतर्गत अरुंद रस्ते, त्यावरच वाढलेली बेकायदा अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांचे मोठे प्रमाण, शहरात नसलेले उद्यान, शहरात नसलेली स्वतंत्र भाजी मंडई, वर्दळीच्या मुख्य चौकात नसलेले सुलभ शौचालय स्वच्छतागृह, नगर परिषदेचा कचरा टाकण्यासाठी नसलेली नगरपरिषद च्या मालकीची जागा असे अनेक प्रश्न नगरपरिषदेला भेडसावत आहेत.

निवडणुका येतात आणि जातात मुख्याधिकारी बदलतात परंतु नगर परिषदेच्या हद्दीत सोयी,सुविधा अगदी मूलभूत सुविधा ही निर्माण होत नाही हे भयानक वास्तव आहे.चाकण परिसराची लोकसंख्या अगदी दीड लाखावर गेलेली आहे. वाढती लोकसंख्या, वाढती रहदारी आणि प्रश्न आहे तेच आहेत. चाकण शहराला जवळ औद्योगिक वसाहत आहे. वसाहतीमुळे परराज्यातील तसेच राज्यातील कामगारांचा मोठा लोंढा या परिसरात आहे. चाकणच्या शेजारी असलेल्या मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी,कडाचीवाडी, बिरदवडी या गावात कामगार वर्ग राहत असला तरी त्याचा मोठा भार मोठ्या प्रमाणात चाकण शहरावर आहे. चाकण शहरातही मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहतो आहे.

कामगार खरेदी करण्यासाठी व इतर कामासाठी चाकण शहरात येतो त्यामुळे वाढती रहदारी हा मोठा प्रश्न आहे. अंतर्गत रस्ते आहेत परंतु ते अरुंद झाले आहेत. त्यावर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात आहे. जो, तो रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात पत्र्याची शेड टाकून अनाधिकृत बांधकामे करत आहेत. त्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. चाकणच्या मराठी शाळेसमोर व इतर ठिकाणी अनेक ठिकाणी अनेक रस्त्यावर अनधिकृत पत्र्याची शेड बांधकामे आहेत .

अगदी माणिक चौक,आंबेठाण चौक,नेहरू चौक, आंबेठाण, तळेगाव, राक्षेवाडी रस्त्यावर अनाधिकृत बांधकामे पत्र्याची शेड मोठ्या प्रमाणात दिसतात. अनधिकृत पत्र्याची शेड,गाळे करणाऱ्यांनी रस्ते अक्षरशः गिळले आहेत. वाढत्या रहदारीमुळे व अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी सातत्याने होत आहे. पण याकडे नगरपरिषद प्रशासन तसेच कोणी नेताही, नगरसेवक लक्ष देत नाही. त्यामुळे चाकणच्या समस्या मोठ्या प्रमाणात आवासून उभ्या आहेत. सध्या नगरपरिषदेवर प्रशासक आहे.

नगर परिषदेच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो तोही कमी दाबाने काही भागात पाणी मिळते तर काही भागात पाणी मिळत नाही. अगदी पाणीपुरवठ्याच्या टाकीला ही जागा मिळत नाही.त्यामुळे अनेकांना अनेक सोसायटीत टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागते अशी भयानक अवस्था आहे. पाणीपुरवठा योजना कागदावर मंजूर झाली आहे परंतु प्रत्यक्षात काम होत नाही. त्यामुळे नागरिक, कामगार संताप व्यक्त करत आहेत. चाकणला स्वतंत्र भाजी मंडई नाही.भाजी मंडई करण्यासाठी जागा नाही त्यामुळे रस्त्यावरच बाजार भरतो. त्या बाजारामुळे रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होते.

माणिक चौकात अनधिकृत भाजीमंडई मुळे असा प्रश्न निर्माण होतो आहे. अतिक्रमणधारकांनी जी अतिक्रमणे केलेली आहेत नगर परिषदेने ही अतिक्रमणे काढणे गरजेचे आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करते आहे तसेच काही नेते याकडे दुर्लक्ष करतात. अतिक्रमणे काढणे महत्त्वाची वाटत नाही त्यात काहींचेआर्थिक हितसंबंध गुंतले आहेत असा नागरिकांचा आरोप आहे. अतिक्रमणे काढावीत रस्ते मोकळे करावेत अशी नागरिकांची मागणी आहे. चाकण नगर परिषदेला स्वतःची जागा मिळत नाही.

चाकण शहरात माणिक चौकात वर्दळीच्या ठिकाणी सुलभ शौचालय, स्वच्छतागृह करण्यासाठी नगरपरिषदेकडे स्वतःची जागा नाही. व्यवसायिकांनी मोठे गृहप्रकल्प, व्यावसायिक प्रकल्प उभारले परंतु त्यांनी मोकळ्या जागा गिळंकृत केलेल्या आहेत त्या नगर परिषदेच्या ताब्यात दिलेल्या नाहीत. मोकळ्या जागेवरही त्यांनी अतिक्रमणे करून ते पैसे लुटत आहेत असे प्रकार होत आहेत.

चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी सांगितले की, " नगरपरिषदेला मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जागा मिळत नाही. अनेक वर्ष शासनाकडे चाकणच्या कचरा प्रकल्पासाठी जागा मिळावी यासाठी मागणी केलेली आहे.परंतु अजूनही त्याला मूहर्त मिळाला नाही,जागा मिळाली नाही.

अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात आहेत कोणाची अतिक्रमणे काढायची हा प्रश्न निर्माण होतो आहे. चाकणला भाजी मंडई साठी जागा नाही. सुलभ शौचालय स्वच्छतागृहासाठी जागा नाही. उद्यान करण्यासाठी जागा नाही त्यामुळे चाकणचा विकास नक्कीच रखडलेला आहे. चाकण नगर परिषदेला शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी. जागांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्यामुळे कोणी जागा देत नाही हे वास्तव आहे. शहराचा विकास होण्यासाठी नगरपरिषदेला जागा मिळणे गरजेचे आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT