Who Is Ajay Taware esakal
पुणे

Who Is Ajay Taware: 'या' प्रकरणात देखील आमदार टिंगरेंचे नाव, अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलणारे डॉ अजय तावरे कोण ?

Who Is Ajay Taware: १९ मे रोजी सकाळी ११ वाजता अल्पवयीन आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. या वेळी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून मद्यपान न केलेल्या व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेण्यात आला.

Sandip Kapde

Who Is Ajay Taware:

पुण्यात १९ मे रोजी झालेल्या पोर्शे स्पोर्ट्स कार अपघातात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आता ससून हॉस्पीटलमधील फॉरेन्सिक विभागाच्या प्रमुख म्हणजेच एचओडीसह २ डॉक्टरांना अटक केली आहे. अल्पवयीन आरोपींच्या रक्ताचे नमुने गायब केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याने आरोपीच्या अल्कोहोलचे प्रमाण निश्चित झाले नाही. अपघाताच्या वेळी तो दारूच्या नशेत होता.

१९ मे रोजी सकाळी ११ वाजता अल्पवयीन मुलाला वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. या वेळी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून मद्यपान न केलेल्या व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेण्यात आला. यामुळे अल्कोहोलची पुष्टी झाली नाही. पोलिस अधिकाऱ्यांना संशय आल्याने पुन्हा रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यात दारूची खात्री झाली. यावरून सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी रक्ताच्या नमुन्यात छेडछाड केल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी डॉ अजय तावरे व डॉ श्रीहरी हरलोर यांना अटक करण्यात आली आहे.

रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले-

डॉक्टरांनी रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले. तर विशाल अग्रवाल हे डॉ अजय तावरे यांच्या प्रत्यक्ष संपर्कात होते, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

डॉ अजय तावरे व डॉ श्रीहरी हरलोर हे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आशीर्वादाने काम करत होते, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.  डॉ अजय तावरे  यांना कुणाचा फोन आला होता, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी धंगेकर यांनी केली.

धंगेकर म्हणाले, ससून मध्ये ढिसाळ कारभार सुरु आहे. मी वर्षभरापासून यावर बोलत आहे. सरकार येथील डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अजय तावरेंना खुर्चीवर बसवण्याचे काम हसन मुश्रीफ यांनी केले. सरकार घोटाळेबाज आहे. ससूनसारख्या सरकारी दवाखान्यात हसन मुश्रीफ यांनी लाळवलेली पिलावळ आहे, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.

डॉ अजय तावरे कोण?

डॉ अजय तावरे यांनी यापूर्वी देखील असे अनेक काम केल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. डॉ अजय तावरे हे ससूनमध्ये फॉरेन्सीक लॅबचे प्रमुख आहेत.

२०२२ मध्ये देशभरात किडनी तस्करीची अनेक प्रकरणे समोर आली होती. महाराष्ट्रात देखील असे प्रकार घडले होते. कोल्हापूरच्या सारिका सुतार या महिलेच्या किडनी तस्करी प्रकरणी राज्य सरकारने कारवाई केली होती. पोलिसांनी ससूनचे अधिक्षक डॉक्टर अजय तावरे यांची उचलबांगडी केली होती.

दहा वर्ष डॉक्टर अजय तावरे हे ससून रुग्णालयाच्या अधीक्षक पदावर कार्यरत होते. कोल्हापूरच्या सारिका सुतार ह्या विधवा महीलेची पुण्यातली रूबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी ट्रासंप्लांटसाठी किडनी काढून घेण्यात आली होती. तेव्हा डॉक्टर अजय तावरे हे अवयव प्रत्यारोपण समितीच्या मुख्य पदावर कार्यरत होते.

२०२३ मध्ये पुन्हा अधिक्षकपदी डॉ अजय तावरे-

डॉ अजय तावरे यांची २९ डिसेंबर २०२३ मध्ये अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ किरणकुमार जाधव यांनी त्यांच्याकडे सुत्रे सोपवली होती. तावरे हे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख होते.

२०२४ ला अधिक्षकपदावरुन राडा -

⁠एप्रील महिन्यात डॅाक्टर अजय तावरे आणि डॅाक्टर यल्लापा जाधव दोघांनीही वैद्यकीय अधीक्षकपदावर दावा केला होता.दोघेही कार्यालयात ठाणमांडून बसले होते.  डॅाक्टर अजय तावरे यांच्याकडी ससूनमधील अधीक्षकपदाचा पदभार शुक्रवारी (१९ एप्रील) काढून घेण्यात आला होता. ⁠

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी तावरेंवर ही कारवाई केली होती. तसेच वैद्यकीय अधीक्षकपदाचा भार डॅाक्टर यल्लापा जाधव यांच्यावर सोपवण्यात आला होता.⁠त्यानुसार जाधव आपल्यापदाचा कार्यभार घेण्यासाठी ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात गेले होते. मात्र यावेळी तावरे तिथे बसले होते.

तावरेंच्या नियुक्तीसाठी आमदाराचं शिफारस पत्र -

डॅाक्टर अजय तावरे यांच्या नियुक्तिसाठी आमदार सुनिल टिंगरे यांनी शिफारस पत्र दिले होते. तर हसन मुश्रीफांनी नियुक्तीचे पत्र दिले होते. टिंगरे पुणे अपघात प्रकरणात देखील चांगलेच चर्चेत आले होते.

सुनील टिंगरे वडगाव शेरीचे अजित पवार गटाचे आमदार आहेत. टिंगरे यांनी २६ डिसेंबर २०२३ रोजी शिफारस पत्र दिले होते. हे पत्र आता व्हायरल झाले आहे. साम टीव्हीने हे पत्र दाखवले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT