Who Is Sharad Mohol: पुण्यात गुन्हेगार विश्वात मोठी खळबळ माजली आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर आज कोथरुडमथील सुतारदरा परिसरात बेछुट गोळीबार करण्यात आला. बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी शरद मोहोळ याच्यावर तीन गोळ्या झाडल्या यातील एका गोळीने शरद मोहोळचा अंत झाला. आज अंत झालेला शरद गुन्हेगारी विश्वात कसा आला? पुण्यातील टोळी संघर्षात शरद कसा शिरला? क्राईम डायरीतील किस्सा जाणून घेऊया...
शरद मोहोळ मुळशी तालुक्यातील एका गावातील होता. अतिशय सामान्य परिस्थितीत तो वाढला. त्याचे आई - वडील शेतकरी होते. गुंड संदीप मोहोळचा ड्रायव्हर म्हणून शरद मोहोळ आधी काम करत होता. मात्र पुण्यात संदीप मोहोळची हत्या झाली त्यांनतर शरद मोहोळ याचा गुन्हेगारी विश्वात प्रवेश झाला. या गोष्टीला १७ वर्ष झाली. वर्ष होतं २००६ त्यावेळी मारणे गँगच्या सुधीर रसाळ यांची बाबा बोडके गँगच्या संदीप मोहोळने हत्या केली होती. सुधीर रसाळ याच्या हत्येनंतर पुण्यात टोळीयुद्धाला सुरुवात झाली होती. या हत्येचं प्रत्युत्तर म्हणून मारणे टोळीने संदीप मोहोळची हत्या केली.
संदीप मोहोळची हत्या शरद मोहोळचा गुन्हेगारी विश्वातील प्रवेशाचा टर्निंग पॉईंट ठरला. संदीपची हत्या झाल्यानंतर पुण्यात गँगवॉर मोठ्या प्रमाणात वाढले. संदीप मोहळची हत्या झाल्यानंतर शरद मोहोळने सुत्र हाती घेतली. त्याने २०१० मध्ये संदीपच्या हत्येचा बदला घेतला. शरदने संदीप मोहोळ हत्येतील सूत्रधार किशोर मारणे याची हत्या केली. या हत्येसाठी शरद मोहोळला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर शरद मोहोळ जामीनावर बाहेर आला होता. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत माहिती दिली.
त्यानंतर शरद मोहोळ याच्या हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल झाले. लवासा प्रकरणातील दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण शरद मोहोळने केल्याचे वृत्त होते.पोलिसांनी त्याला अटक देखील केली होती. मात्र तो गुन्हा करायचा तुरुंगात जायचा आणि बाहेर यायचा.
२०१२ मध्ये कारागृहात असताना संशयित दहशतवादी महम्मद कातिल महम्मद जाफर सिद्दीकी ऊर्फ सज्जन ऊर्फ साजन ऊर्फ शहजादा सलीम याचा अंडासेलमध्ये बर्मुड्याच्या नाडीने ८ जून २०१२ ला गळा आवळून खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी कुख्यात गुंड शरद हिरामण मोहोळ (३४, रा. माऊलीनगर, सुतारदरा कोथरूड ता. मुळशी) आणि आलोक शिवाजीराव भालेराव (वय २८, रा. मु.पो. मुठा, ता. मुळशी जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्कता करण्यात आली होती.
यानंतर शरद मोहोळ यांची प्रतिमा राष्ट्रभक्त अशी काही संघटनांनी तयार केली. कारण त्याने तुरुंगात एका दहशतवाद्याला मारले होते. त्यामुळे शरद मोहोळ अनेक सामाजीक आणि राजकीय व्यासपीठावर ते दिसू लागले. मात्र त्याचा गुन्हेगारी विश्वातील वावर कमी झाला नव्हता त्यामुळे आज त्याती हत्या झाल्याची शक्यता आहे. ही हत्या जर टोळीसंघर्षातून झाली असेल तर हा टोळीसंघर्ष कधी संपणार, असा प्रश्ना नागरिक विचारत आहेत. (Latest Marathi News)
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार त्यावेळी पुण्यातील अनेक टोळ्या विविध व्यावसायिकांकडून आणि उद्योजकांकडून खंडणी वसूल करत असत. पौड, पिरंगूट आणि मुळशीच्या भागातून आखाड्यातली मुलं या गँगमध्ये भरती केली जात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.