पुणे

महापौरपद भोसरी की चिंचवडला? 

अविनाश चिलेकर

पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महापौर व उपमहापौर बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तत्काळ त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांच्या राजीनाम्यानंतर या पदावर आता कोणाला संधी मिळणार याचीच उत्कंठा आहे. महापौरपदासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि दुसऱ्या बाजूने चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांमध्ये रस्सीखेच आहे. शुक्रवारी (ता. 27) मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत त्याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. 

महापौर, उपमहापौरपदाचा कालावधी नियमानुसार अडीच वर्षांचा आहे. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून भाजपने तो सव्वा वर्षाचा केला. त्यानुसार महापौर, उपमहापौरांची मुदत दीड महिन्यापूर्वीच संपुष्टात आली. दरम्यानच्या काळात स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्या वेळी हे पद भोसरीकरांना अपेक्षित असताना अचानक आमदार जगताप यांच्याकडे गेले आणि ममता गायकवाड यांना संधी मिळाली. त्यातूनच भाजपमधील दोन आमदारांमधील संघर्ष उफाळून आला. लांडगे यांनी "...आता पुढचा महापौर भोसरीचाच' असा निर्धार केला. दुसरीकडे जगताप यांनीही आगामी लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची असल्याने "महापौर चिंचवडचाच करणार..' असा निश्‍चय केला. या संघर्षात प्रसंगी शहर भाजपमध्ये उभी फूट पडून एक गट राष्ट्रवादी कॉंग्रेसला जाऊन मिळेल आणि इथे सत्तांतर घडेल अशीही शक्‍यता व्यक्त केली जात होती. सर्व राजकीय उलथापालथ टाळण्यासाठी गेले दीड महिना राजीनामा नाट्य पुढे ढकलण्यात आले. सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही आमदारांशी चर्चा केल्यानंतर अखेर राजीनामा देण्यात आला. 

महापौरपदासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, सुरेश भोईर, तर भोसरी विधानसभा क्षेत्रातील राहुल जाधव, संतोष लोंढे यांची नावे प्रामुख्याने स्पर्धेत आहेत. त्यातल्या त्यात काटे आणि जाधव यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. काटे यांना संधी मिळावी म्हणून जगताप यांनी सर्व ताकद पणाला लावली आहे, तर तिकडे लांडगे यांनी जाधव यांना "शब्द' दिला आहे. महापौरपद चिंचवडला मिळाले, तर पुढचा सत्ताधारी नेता हा भोसरीमधील असणार आहे. त्याऐवजी राहुल जाधव यांना संधी मिळाली तर काटे हे सत्ताधारी नेतेपदी विराजमान होतील. या दोघांचीही दुसरी टर्म, तसेच अनुभव पाहता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याशिवाय दुसरे नाव अंतिम स्पर्धेत असण्याची शक्‍यता कमी आहे. 

गावववाल्यांची नाराजी झाली, म्हणून... 
भाजपच्या पहिल्या स्थायी समिती अध्यक्ष होण्याचा मान आमदार लक्ष्मण जगताप समर्थक सीमा सावळे यांना मिळाला. सर्वांत अनुभवी आणि मागासवर्गीय म्हणून त्यांना संधी देण्यात आली होती. त्यापाठोपाठ याच पदावर पुन्हा मागास समाजातील ममता गायकवाड यांना जगताप यांनी संधी दिल्याने गाववाल्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर होता. त्यांनी तो जगताप यांच्याकडे बोलून दाखविला. आगामी काळात हे परवडणारे नाही म्हणून त्यांनी आता महापौरपद काटे यांना देऊन नाराजी दूर करण्याचे आश्‍वासन पाहुण्यारावळ्यांना दिल्याचे समजते. स्वतः जगताप हे सुद्धा काटे यांच्या नावावर ठाम आहेत. 

पवार यांचीही लवकरच दांडी 
महापौर, उपमहापौर निवडणुकीनंतर सत्ताधारी पक्षनेते एकनाथ पवार यांचाही राजीनामा घेण्याचे ठरले आहे. पवार यांना यापुढेही कायम ठेवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू होत्या. भाजपच्या काही निष्ठावंतांनी दबाव टाकल्याने तसेच केंद्रीय सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्याकडून शिफारस आल्याने त्यांना एक महिन्यासाठी जीवदान मिळाले. महापौर, उपमहापौर निवडीनंतर ज्या गटाला संधी मिळणार नाही, त्यांच्याकडे हे पद जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT