पुणे

ठाकरेंनी पुण्यातच का घेतले पक्षाचे शिबीर, काय आहे त्या मागचे राजकीय कारण? घ्या जाणून

Pune: १५ दिवसाच्या आताच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पुण्यात शिबिर झाले. यामध्ये अमित शहांनी केलेल्या सडेतोड दिले. | Uddhav Thackeray Pune Move Decoded Political Reasons Behind Shiv Sena Shift

​ ब्रिजमोहन पाटील

Uddhav Thackeray: मुंबई विशेष लक्ष असणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे पुण्यात मात्र निवडणुकीपुरताच एखाद्या सभेपुरताच दौरा असायचा, बाकी सगळी सूत्र मुंबईतूनच हलवली जायची. मात्र, आता विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे अनेक वर्षानंतर पुण्यात मुक्काम ठोकला.

आजच्या शिबिरात मार्गदर्शन करत शिवसैनिकांच्या मनात चैतन्याची मशाल पेटविण्यासाठी ठाकरी शैलीत प्रयत्न केला. त्याचसह राज्यात पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मुख्यमंत्री करायचा असले तर २१ जागा असलेल्या पुण्यातून आमदार निवडून आणणे आवश्‍यक आहे. हेच हेरून उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले.

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील वातावरण महाविकास आघाडीला पोषक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दारुण पराभव झालेल्या भाजपने प्रदेश पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन पुण्यात घेतले, त्याचसोबत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी विधानसभेत कामगिरी सुधारण्यासाठी चर्चा केली. भाजपच्या अधिवेशनानंतर १५ दिवसाच्या आताच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पुण्यात शिबिर झाले. यामध्ये अमित शहांनी केलेल्या सडेतोड दिले.

गेल्या काही वर्षात पुण्यातील शिवसेनेमध्‍ये मरगळ आली. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत शहरातून शिवसेनेचा एकही आमदार निवडून गेलेला नाही. तसेच जिल्ह्यातूनही आमदार विधानसभेत गेलेला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा खुर्चीत बसवायचा असेल पुणे शहर व जिल्ह्यातून ताकद वाढणे आवश्‍यक आहे. पक्षफुटीनंतर पुण्यातून शिंदे गटात जाणाऱ्या शिवसैनिकांनी संख्या कमी असली तरी ठाकरेंकडूनही पुण्यातून नव्या पदाधिकाऱ्यांना मोठी संधी मिळालेली नाही.

अशा स्थितीत पुण्यात झालेल्या या शिबिरामुळे शिवसैनिकांमधील उदासीनता दूर करून त्यांना आक्रमक करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी या शिबिरातून केला. त्याच प्रमाणे संजय राऊत यांनी शिवसैनिकांनी सतर्क राहावे, शिवसेना व उद्धव ठाकरे ही आपली पहिली पसंती असल्याचे सांगत मुख्यमंत्रिपदावर अप्रत्यक्ष दावा केला.

सुषमा अंधारे यांनी शहरातील वडगाव शेरी, हडपसर, कोथरूड जागेवर उघड दावा केला. तर भास्कर जाधव यांनी भाजपवर प्रहार करत शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न शिबिरातून केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT