Court_Alimony 
पुणे

पत्नी नोकरी करण्यास सक्षम असली तरी पोटगी द्यावीच लागेल; हायकोर्टाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पत्नी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे. तसेच शिक्षणाच्या बळावर तिला नोकरी मिळू शकते. ती लग्नापूर्वी नोकरी करीत होती. त्यामुळे नोकरी करण्याची क्षमता असलेल्या पत्नीस पोटगी नाकारावी, असा युक्तिवाद करीत केलेले पोटगी रद्द करण्यासाठीचे अपील उच्च न्यायालयाने फेटाळले आहे. पत्नी नोकरी करण्यास सक्षम असली तरीही तिला पोगटी द्यावीच लागेल, असा निकाल एका दाव्यात उच्च न्यायालयाने दिला आहे.

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. कर्णिक यांच्या न्यायालयात या दाव्याची सुनावणी झाली. कौटुंबिक वाद झाल्याने रेश्‍मा आणि प्रीतम (नावे बदललेली) हे २०१६ पासून वेगळे राहत होते. त्याच्या दाव्यात न्यायालयाने हा निकाल दिला. २०१४ साली त्यांचे लग्न झाले होते. पुण्यात राहत असलेल्या या जोडप्याला मुल-बाळ नाही. रेश्‍मा या गृहणी आहेत. तर प्रीतम हे एका बड्या आयटी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करतात. सततच्या वादामुळे दोघे वेगळे राहत होते. त्यानंतर रेश्‍मा यांनी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल करीत पोटगी मिळण्याची मागणी केली होती. त्यात प्रथमवर्ग न्यायादंडाधिका-यांनी दरमहा ३५ हजार रुपयांची पोटगी मंजूर केली होती. ॲड. पूजा अगरवाल यांनी रेश्‍मा यांच्यावतीने बाजू मांडली.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात प्रीतम यांनी सत्र न्यायालयात अपील केले होते. हे अपील फेटाळण्यात आले. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. रेश्‍मा हा लग्नाआधी नोकरीला होत्या. पोटगी मिळावी म्हणून त्या घरी बसलेल्या आहेत. त्यामुळे पोटगीचा आदेश रद्द करावा, असा युक्तिवाद प्रीतम यांच्या वकीलांनी केला, पण त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावत सत्र न्यायालयाने दिलेला पोटगीचा आदेश उच्च न्यायालयाने कायम ठेवला.

पत्नीचे चांगले शिक्षण झाले आहे. ती नोकरी करू शकते, अशी कारणे देत पोटगी नाकारण्याची मागणी करण्यात येते. मात्र वेगळ्या राहत असलेल्या पत्नीची आर्थिक परिस्थिती देखील समजावून घेतली पाहिजे. या प्रकरणातील पती पत्नीला सोडून चेन्नइला निघून गेला आहे.
- पूजा अगरवाल, रेश्‍मा यांच्या वकील

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT