wild animal himalayan ibex sakal
पुणे

Wild India Mahotsav : ‘वाईल्ड इंडिया’ महोत्सवात उलगडणार हिमालयातील माहितीचा खजिना

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नेचर वॉक संस्था आणि गोल्डन लीफ बँक्वेट हॉलतर्फे आयोजित ‘वाईल्ड इंडिया’ वन्यजीव महोत्सवास शुक्रवारपासून (ता. २) सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार नरेश बेदी आणि राजेश बेदी ‘मोनार्क्स ऑफ द हिमालयाज’ या हिमालयातील जैवविविधतेवरील माहितीपटाचा आस्वाद निसर्गप्रेमींना ‘एनएफडीसी’च्या नॅशनल फिल्म आर्काईव्ह ऑफ इंडियाच्या प्रेक्षागृहात घेता येईल.

नरेश बेदी हे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असून नरेश व राजेश यांना भारतीय वन्यजीव चित्रपटनिर्मिती या विषयाचे आद्य चित्रपटकार मानण्यात येते. ‘मोनार्क्स ऑफ द हिमालयाज’ या माहितीपटात ‘हिमालयनीन आयबेक्स’ या वन्यप्राण्याविषयी माहिती आहे.

हिमालयासारख्या दुर्गम भागात अधिवास असणारा शेळीवर्गाचा हा वन्यप्राणी. या वन्यप्राण्यावर माहितीपट रूपातून फारसे काम झालेले नाही. त्यामुळेच बेदी बंधूंच्या या माहितीपटाला विशेष महत्त्व आहे. हिमालयातील इकोसिस्टिमचा आणि अन्नसाखळीचा महत्त्वपूर्ण भाग असणाऱ्या या वन्यप्राण्यावर बनवलेला हा माहितीपट सर्वांनी जरूर पाहावा असा आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्रीय सशक्तीकरण समितीचे सदस्य आणि राज्याचे माजी प्रधान मुख्य संरक्षक सुनील लिमये, पुण्याचे मुख्य वनसंरक्षक(प्रादेशिक) एन. आर. प्रवीण आदी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला सेराटेक टाइल्स, अमेय प्रिसिजन इंजिनिअर्स, एरो मॉल, पंडित-जावडेकर बिल्डर्स आणि सिद्धार्थ ऑटो इंजिनिअर्स यांचे पाठबळ लाभले आहे. तसेच बीएनएचएस, शोध इको आणि मोडगी हेरिटेज डिझाईन्स यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक आहेत. हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून जास्तीत जास्त निसर्गप्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांना केले आहे.

कार्यक्रम स्थळ व वेळ

शुक्रवारी (ता. २) सायं. ६.१५ वा. - एनएफडीसीचे नॅशनल फिल्म आर्काईव्ह ऑफ इंडियाचे प्रेक्षागृह, विधी महाविद्यालय रस्ता, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs SL मॅचमध्ये वाद, आधी आऊट, मग नॉट आऊट... रुमालामुळे निर्णयच बदलला! काय घडलं?

Gold Prices: लवकरच सोने 85 हजारांवर पोहचणार! गुंतवणूकदार होणार मालामाल; किती मिळणार रिटर्न?

Amitabh Bachchan : जेव्हा अमिताभ दिवसाला 200 सिगारेट्स ओढायचे आणि होतं या गोष्टीचं जबरदस्त व्यसन ; "मी तेव्हा हाताला..."

Cabinet Meeting : आता ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करणे पडणार महागात! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Vehicle Act: आता १६ वर्षीय सुद्धा दुचाकी चालवू शकतील! मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्याचा सरकारचा प्रस्ताव, वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT