Will try to start ESIC Hospital in Baramati Sharad Pawars testimony to entrepreneurs 
पुणे

बारामतीत ईएसआयसीचे रुग्णालय सुरु करण्याचा प्रयत्न करु

शरद पवार यांची उद्योजकांना ग्वाही

मिलिंद संगई

बारामती - केंद्राच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडे बारामती परिसरातील नोंदणीकृत कामगारांची मोठी संख्या विचारात घेता बारामती मध्ये ईएसआयसीचे (ESIC) रुग्णालय होणे गरजेचे आहे, याबाबत आपण केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी बोलू, असे आश्वासन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिले.

बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने बुधवारी (ता. 10) पवार यांची बारामतीत भेट घेतली. त्या प्रसंगी त्यांनी हे आश्वासन दिले. बारामतीच्या विस्तारित एमआयडीसी मध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रातील एखादा मोठा उद्योग आणण्यासाठीही सकारात्मक विचार करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

बारामती इंडस्ट्रियल मँन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, अंबीरशाह शेख वकील, संभाजी माने, शिवराज जामदार आदींच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन बारामती एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करून निवेदन दिले.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ कायदा बारामती परिसराला 2016 पासून लागू करण्यात आलेला असून या कायद्यानुसार आस्थापना व कामगार मिळून वेतनाच्या साडेसहा टक्के रक्कम ESIC कडे भरावी लागते. या माध्यमातून विमा महामंडळाने कोट्यावधी रुपये आजपर्यंत वसूल केलेले आहेत. या शुल्कातून कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना विनामूल्य दर्जेदार वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देणे महामंडळावर बंधनकारक आहे, परंतु विमा महामंडळाचे बारामतीत रुग्णालय नसल्यामुळे कामगारांना या हक्काच्या वैद्यकीय सुविधेपासून वंचित रहावे लागत आहे.

काही खाजगी रुग्णालयांसोबत महामंडळाने करार केले आहेत परंतु त्यांच्या सेवा खर्चिक व असमाधानकारक असल्याच्या कामगारांच्या तक्रारी आहेत. यामुळे नाईलाजास्तव कामगारांना उपचारासाठी पुण्यातील ई. एस. आय. सी. रुग्णालयात जावे लागते, ही बाब धनंजय जामदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पवार यांच्या निदर्शनास आणून दिली.

बारामतीत एमआयडीसीने औद्योगिक क्षेत्राचा विस्तार सुरु केला असून या नवीन जागेवर ॲटोमोबाईल क्षेत्रातील एखादा मोठा उद्योग आणल्यास बारामती मधील लघुउद्योगांना निश्चित चालना मिळेल, त्यामुळे असा आपणाकडून प्रयत्न व्हावा असे साकडे घातले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT