पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. विजयासाठी आवश्यक असलेला मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी किमान एक लाखांच्या वर मते घ्यावी लागणार आहे. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाच्या उमेदवाराला हा कोटा पूर्ण करणे शक्य नसल्याने प्राधान्य क्रमाच्या मतांवर उमेदवारचे भवितव्य ठरणार आहे.
विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी 57.96 टक्के मतदान झाले. गुरूवारी (ता.3) सकाळी मतमोजणीस सुरूवात होणार आहे. महाविकास आघाडी विरुध्द भाजप असा थेट सामना असल्याने या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी ताकदीने निवडणुक प्रचार केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यात राजकीय पक्षांना यश आले. त्यामुळे एरवी सहज वाटणाऱ्या या निवडणुकीत उमेदवारांना विजयासाठी झगडावे लागणार असल्याचे सध्या तरी चित्र आहे.
पुणे विभागात एकूण 4 लाख 26 हजार 257 पैकी 2 लाख 47 हजार 50 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. एकूण मतदारांच्या संख्येपैकी 57, 97 टक्के मतदारांनी मतदान केले आहे. प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत. बाद मते वगळून जी वैध मते मिळतील. त्या एकूण वैध मतांच्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मते हा विजय मिळविण्यासाठी कोटा असणार आहे. हे विचारात घेतल्यानंतर पहिल्या फेरीत ज्या उमेदवार एक लाखांहून अधिक मतांचा टप्पा पार केले. त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आहे. अन्यथा प्राधानक्रमांच्या मतांवर ही माळ कोणच्या गळ्यात पडणार हे ठरणार आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची मतमोजणी ही पारंपारीक पद्धतीने होणार आहे. झालेले मतदान विचारात घेतले, तर मोजणीपूर्ण होण्यास किमान 36 तासांचा कालवधी लागणार आहे. पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक तो मतांचा कोटा एखाद्या उमेदवाराने पूर्ण केला तर कालवधी कमी होईल. प्राधान्यक्रमांच्या मतांवर मोजणी गेली, तर हा कालवधी आणखी वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
पदवीधर मतदारसंघ
जिल्हा | एकूण मतदार | झालेले मतदान | टक्केवारी |
पुणे | 1,23,611 | 61,404 | 44.95 टक्के |
सातारा | 56,071 | 34,421 | 58.27 टक्के |
सांगली | 87,233 | 56,743 | 65.05 टक्के |
सोलापूर | 53,813 | 33,520 | 62.29 टक्के |
कोल्हापूर | 89,529 | 60,962 | 68.09 टक्के |
एकूण | 4,26,257 | 2,47,050 | 57.96 टक्के |
शिक्षक मतदारसंघ
जिल्हा | एकूण मतदार | झालेले मतदान | टक्केवारी |
पुणे | 32,201 | 18,849 | 58.54 टक्के |
सातारा | 7,711 | 6,320 | 81.96 टक्के |
सांगली | 6,812 | 5,651 | 82.96 टक्के |
सोलापूर | 13,584 | 11,558 | 85.09 टक्के |
कोल्हापूर | 12,237 | 10,609 | 86.70 टक्के |
एकूण | 72,545 | 52,987 | 73.04 टक्के |
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.