Dattatray Bharne  Sakal
पुणे

Farmer Electricity : हिवाळी अधिवेशनामध्ये सरसकट शेतकऱ्यांच्या वीज माफीची मागणी करणार - दत्तात्रेय भरणे

राज्याच्या उत्पन्नामध्ये सर्वाधिक वाढ झाली असून, येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या वीजबिलाची सरसकट माफी करण्याची मागणी आम्ही करणार.

राजकुमार थोरात

राज्याच्या उत्पन्नामध्ये सर्वाधिक वाढ झाली असून, येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या वीजबिलाची सरसकट माफी करण्याची मागणी आम्ही करणार.

वालचंदनगर - राज्याच्या उत्पन्नामध्ये सर्वाधिक वाढ झाली असून, येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या वीजबिलाची सरसकट माफी करण्याची मागणी आम्ही करणार असून, सरकारने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तातडीने सुरु करण्याची मागणी माजी राज्यमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केली.

निमसाखर (ता. इंदापूर) येथील कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित होते. यावेळी भरणे यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळामध्ये राज्यसरकरचा महसूल कमी झाला होता. एक हजार कोटीवरती महसूल आल्याने नियोजन करणे अवघड झाले होते. लॉकडाउनमुळे उद्योगधंद बंद असल्यामुळे जीएसटी घटला होता. परीणामी महसूल कमी झाल्यामुळे राज्यसरकारवर आर्थिक ताण आला होता. मात्र सध्या राज्यसरकारचे उत्पन्न वाढले आहे. सरकारला २३ हजार ते २४ हजार कोटी रुपये जीएसटीमधून मिळत आहेत.

सरकारला शेतकऱ्यांची काळजी असेल,कळवळा असले तर त्यांनी सरसकट शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावी. आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये वीजबिल माफीची मागणी लावून धरणार आहे. सध्या शेतकऱ्यांच्याकडे पैसे नसून सरकारने शेतकऱ्यांची बंद केलेला वीजपंपाचा वीजपुरवठा तातडीने सुरु करण्याची मागणी केली. यावेळी भरणे यांनी सांगितले की, विरोधक सांगताच केंद्रात व राज्यात आमचे सरकार आहे. मात्र बारामती लोकसभा मतदार संघात व इंदापूर तालुक्यातही राष्ट्रवादीचा खासदार व आमदार असल्याचे आहे. तसेच तालुक्यातील उद्घट, तावशी, भरणेवाडी, सणसर, शेळगाव, वडापुरी, वालचंदनगर, कळस या गावासांठी जलजीवन मिशनमधून ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी नव्याने मंजूर झाला असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT