Fursungi Water Tanker 
पुणे

Fursungi Water Tanker: पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Amit Ujagare (अमित उजागरे)

फुरसुंगी : पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याची घटना पुण्यातील हडपसरजवळील फुरसुंगी इथं घडली. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघड झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. (Woman body was found in a water tanker in Pune Fursungi)

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशल्या मुकेश  मोर्या (वय २५, रा. दुगड चाळ, जेएसपीएम कॉलेज जवळ, हांडेवाडी) असं मृत महिलेचं नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात ही महिला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली होती. येथील पावर हाउस या भागात नेहमीप्रमाणं सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पाण्याचा टँकर आला होता. पाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

सुरुवातीला टँकरमधून पाणी सुरू झाले, मात्र काही वेळाने एकदमच पाणी येणे बंद झाले. पाणी बंद का झाले हे पाहण्यासाठी उतरलेल्या टँकर चालकाला साडीचा तुकडा अडकल्याचे निदर्शनास आले. साडीचा तुकडा ओढून देखील बाहेर निघत नसल्याने टँकरवर चढून त्यानं टँकरमध्ये डोकाऊन पाहिलं असता महिलेचा मृतदेह असल्याचे त्याला दिसले. त्याने याबाबत त्वरित हडपसर पोलिसांना संपर्क साधून याची माहिती कळवली.

हडपसर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी त्वरित धाव घेत हा मृतदेह बाहेर काढून पंचनामा करीत पुढील तपासासाठी हा मृतदेह ससून रुग्णालयात शव विच्छादनासाठी पाठवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20WC: भारताने पाकिस्तानला हरवले, तरीही टेंशन कायम; Semi Final चे ‘स्कोअर’ जुळता जुळेना...

Arvind Kejriwal : "...तर विधानसभा निवडणुकीत मी भाजपचा प्रचार करेन"; नेमकं काय म्हणले केजरीवाल?

Bigg Boss Marathi 5 Grand Finale LIVE Updates - अंकिता वालावलकर 'बिग बॉस मराठी ५' मधून बाहेर

IND W vs PAK W: ०.४४ सेकंद! Richa Ghosh ची भारी रिअ‍ॅक्शन, अविश्वसनीय झेल घेऊन पाकिस्तानला दाखवला इंगा

Kedar Shinde On BB Marathi 5: म्हणून 'बिग बॉस मराठी 5' 70 दिवसात संपलं; केदार शिंदेनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT