woman gave birth in an ambulance sakal
पुणे

Bhor News : रुग्णवाहीकेतच केली महिलेची प्रसुती; माता व नवजात बालिका सुखरुप

सकाळ वृत्तसेवा

भोर - तालुक्यातील शासनाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकारी आणि आशा वर्कर यांनी मंगळवारी (ता. २४) पहाटे महिलेची रुग्णवाहीकेतच प्रसुती करून नवजात बालीकेसह महिलेला जीवदान दिले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलींद कांबळे आणि आशा वर्कर मीना चव्हाण यांचे महिलेच्या नातेवाईंकांनी अभिनंदन केले.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे ५ वाजून ३८ मिनिटांनी १०८ क्रमांकावर पेंजळवाडी (ता. भोर) येथील महिलेस प्रसुतीस घेऊन जाण्यासाठी कॉल आला. त्यावेळी १०८ क्रमांकाची रुग्णवाहीका ही भोर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात होती. रुग्णवाहीकेचे चालक सचिन राऊत यांच्यासह डॉ. मिलींद कांबळे हे २२ किलोमीटरचे अंतर केवळ २० मिनिटांमध्येच पार करून पेंजळवाडीत पोहोचले.

तेथून गरोदर महिला काजल रंगराव चव्हाण यांना रुग्णवाहीकेमध्ये घेतली आणि रुग्णवाहीका भोंगवली (ता. भोर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे निघाली. सद्यस्थितीत पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यावर पाणी, चिखल आणि खड्डे होते. भोंगवलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर पोहोचण्यासाठी वेळ लागणार होता.

परंतु महिलेला खूपच तीव्र प्रसुतीवेदना होत असल्यामुळे रुग्णवाहीका रस्त्याच्या कडेला थांबवली. आणि ६ वाजून १४ मिनीटांनी रुग्णवाहीकेतच डॉक्टरांनी तिची सुखरुप प्रसुती केली. त्यांनी एका बालीकेला जन्म दिला असून, नवजात बालिका आणि आई दोन्हीही सुस्थितीत आहेत. प्रसुती सुरळीत झाल्यानतर डॉक्टरांनी तिला भोंगवलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. महिलेच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी डॉक्टर, आशा वर्कर आणि चालक यांचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Retention : MS Dhoni अनकॅप्ड खेळाडू, परदेशी खेळाडूंवर बंदीची तलवार... BCCI ने जाहीर केले ८ महत्त्वाचे नियम

IND vs BAN 2nd Test : दुसऱ्या दिवसावर पडलं पावसाचं पाणी, भारतात ९ वर्षांनी पहिल्यांदाच असं झालंय

Manoj Jarange: यंदा मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा? 'येथे' होणार भव्य-दिव्य कार्यक्रम, उद्या बीडमध्ये बैठक

IND vs BAN: टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या कॅप्टन, तर 150 kmph वेगात बॉलिंग करणाऱ्या मयंक यादवलाही संधी

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होणार'' राज ठाकरेंनी मांडलं गणित

SCROLL FOR NEXT