पुणे

बाळंतपणासाठी बाईची हेळसांड

वेळीच उपचार मिळाल्याने बाळ व बाळंतीण दोघांचाही जीव वाचला

सकाळ वृत्तसेवा

कोथरुड : ससून येथे दवाखान्यात घेतले नाही म्हणून घराकडे परतलेल्या गरोदर स्रीचे कोथरुडमधील जळकी वस्ती येथे घरातच बाळंतपण झाले. वार पडली नसल्याने बाईच्या जीवाला धोका पोहचू शकतो म्हणून घरच्यांनी तीला सुतारदवाखान्यात आणले. तेथे वेळीच उपचार मिळाल्याने बाळ व बाळंतीण दोघांचाही जीव वाचला.

उमा डोलारे म्हणाल्या की, ससूनला कोणी घ्यायना म्हणून माझी सून नव-या सोबत परत कोथरुडच्या जळक्या वसाहतीत (लोकमान्य झोपडपट्टी ) आली. दरवाजात पाऊल टाकताच ती बाळंत झाली. पण वार काही पडत नव्हती. वार छातीला भिडली तर बाईचा जीव जावु शकतो. काळजीने त्यांनी तीला तसेच रीक्षात घालून सुतारदवाखान्यात आणले. तेथे उपचार मिळाले आणि जीव वाचला.

डोलारे बाईं म्हणाल्या की, दवाखान्यात घेत नाही म्हटल्यावर गरीबाने काय करायचे. बाळंतपण ही तर देवानी दिलेली देणगी. तीला दोन लेकरं झाली तेव्हाच ऑपरेशन करणार होते पण पेशंटचे काहीतरी झाले त्यामुळे ती ऑपरेशनला घाबरत होती. आता ऑपरेशन केल्यावरच तीला घरला नेते. पुजा डोलारे यांचे पती संतोष डोलारे म्हणाले की, मी भंगारचा धंदा करतो. आम्ही सकाळीच ससूनला गेलो होतो. पण नाव नोंदवलेले नाही. सोनोग्राफी व कागदपत्रे नाहीत असे सांगून आम्हाला परत लावले. यापूर्वीही आम्ही ससूनला गेलो होतो. पण मला सहा लेकरं आहेत म्हटल्यावर त्यांनी नाव नोंदवून घेतले नाही. तुम्हाला टीबी, एचआयव्ही आहे का याची चौकशी करत बायकोला घाबरवून सोडले.

ससून येथे चौकशी केली असता तेथील आरोग्य कर्मचा-यांनी जास्त मुले आहेत म्हणून वा कागदपत्रे नाहीत म्हणून कोणाला परत पाठवले असे घडलेच नसल्याचे सांगितले. दाते नर्स म्हणाल्या की, आमच्याकडे एका बाईला पाच मुले आहेत तीचे नुकतेच बाळंतपण झाले. त्यामुळे आमच्याकडे अशी घटना घडने शक्य नाही. सुतार दवाखान्यातील डॉ. अमित सकपाळ म्हणाले की, ससून असो की आमचा दवाखाना उपचार न करता परत पाठवले असे होवूच शकत नाही. आम्ही बाईंवर तातडीने उपचार केले. बाळ व बाळंतीण दोघेही सुखरुप आहेत.

शास्रीनगर येथे राहणारे रफीक शेख म्हणाले की, दोन पेक्षा अधिक मुले असणारांना सरकारी सवलतींचा लाभ घेता येणार नाही असे सांगण्यात येते. जेव्हा एखादा जीव वाचवण्याचा प्रश्न येईल तेव्हा तुम्ही नियम दाखवणार की माणूस वाचवणार. सकाळी दहाची वेळ. अंगावर चादर घातलेली एक बाई हातात नुकतेच जन्मलेले मुल घेवून कोथरुडच्या जयाबाई सुतार दवाखान्याच्या दारापाशी उभी होती. तीला नीट उभे रहावत नसल्याने तीच्या सोबत आलेल्या दोन महिलांनी तीला आपल्या हाताने आधार दिला होता. हे दृश्य पाहताच दवाखान्यात आलेल्यांनी येथील कर्मचा-यांना स्ट्रेचर आणायला सांगितले. पण आरोग्य कर्मचारी कुटूंब नियोजन शस्रक्रियेच्या व इतर कामात व्यस्त होते. सुरक्षा रक्षक महिलांनी धावत जावून दुस-या मजल्यावरुन नर्स सोबत स्ट्रेचर आणेपर्यंत दहा मिनीटाचा वेळ गेला होता. डॉक्टरांनी तातडीने वार बाहेर काढून बाळाची नाळ कापली व इतर उपचार केले. सुदैवाने बाळ आणि बाळंतीण सुखरुप होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT