जुनी सांगवी (पुणे) : ‘सांगवीतील स्मशानभूमीचे काम गेली एक ते दीड वर्षापासून संथ गतीने चालू आहे. नव्या सत्ताधाऱ्यांना स्मशानभूमीच्या जुन्या कामातून काही मिळत नाही, म्हणून त्यांच्याकडून काम करु दिले जात नाही. मात्र काम आमच्यामुळे रखडल्याची उलटी बोंब मारत आहेत. असा आरोप राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे सत्ताधाऱ्यांवर केला आहे.
गेली दिड वर्षापासुन स्मशानभुमीचे काम संथगतीने सुरू आहे. सांगवी स्मशानभूमीची जागा मूळ जागा मालकांनी अडवणूक न करता रितसर मोबदला देण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली. मात्र या गोष्टीचे राजकारण करण्यात आले.
स्मशानभूमीचे नियोजन व प्रत्यक्ष काम 2016 मध्येच चालू झाले. त्यावेळी जागा मालकांना विश्वास दिला होता. परंतु, 2017 मध्ये सत्तांतरानंतर आलेल्या प्रतिनिधींना विकास करणे दूरच पण चालू असणारे कामही व्यवस्थित करता येत नाही. सत्ताधाऱ्यांचे मोठे पदाधिकारी या परिसरात असूनही त्यांचा या कामावर अंकुश नाही. आयुक्तही या कामाच्या दिरंगाईस जबाबदार आहेत. त्यासाठी महासभेत हा विषय संपादित करण्याची मान्यता व्हावी आणि तातडीने स्मशानभूमीचे काम चालू करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे प्रशांत शितोळे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.