Artificial Intelligence esakal
पुणे

Baramati News : बारामती येथे जागतिक दर्जाचा कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रम सुरू

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २६) मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी अँड क्लायमेट चेंज’ हा कृषी क्षेत्रातील कृत्रीम बुद्धीमता या विषयावरील जागतिक दर्जाचा अभ्यासक्रम बारामती येथे सुरू करण्यात आला आहे. यामुळे देशातील कृषी क्षेत्रातही आता कृत्रीम बुद्धीमतेचा वापर होणार आहे. हा ऑनलाईन अभ्यासक्रम असून येत्या जानेवारीपासून या अभ्यासक्रमाची पहिली बॅच (वर्ग) सुरू केली जाणार आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २६) मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये या अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठातील कृत्रीम बुद्धीमत्ता (ए. आय.) विभागाचे संचालक डॉ. अजित जावकर, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्‍वस्त प्रतापराव पवार, या ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, ‘क्लिक टू क्लाउड’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत मिश्रा, इन्नोसेपियन ॲग्रो 'टेक्नॉलॉजिज'चे मुख्य कार्यकारी अधिकारी सारंग नेरकर, माजी कुलगुरू शंकरराव मगर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सल्लागार शिवाजीराव देशमुख, महासंचालक संभाजी कडू पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, "याआधी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून बारामतीमध्ये ‘सेंटर फॉर एक्सलन्स फार्म व्हाइब्ज प्रकल्प’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा प्रकल्प येत्या जानेवारीमध्ये बारामती येथे होत असलेल्या कृषक प्रदर्शनात सुरू केला जाणार आहे. याशिवाय ऊस उत्पादनात गेम चेंजर ठरणाऱ्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या दोन्ही संस्था एकत्रित काम करणार आहेत.'

येत्या काळात शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला कृषी क्षेत्रात आणण्यासाठी व हे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत कसे नेता येईल, यासाठी बारामती अॅग्रिकल्चरल ट्रस्ट पावले टाकत आहे. त्यासाठी बिल गेट्‍स फाउंडेशन, मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड अशा जागतिक दर्जाच्या संस्था एकत्र येत आहेत. दरम्यान, याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उसातील साखर उतारा वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या वर्षी इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी भारत व इंग्लंड यांच्यात करार करताना सहा ठळक बाबींची यादी तयार केली होती. यात दुसऱ्या क्रमांकावर ऑक्सफर्ड विद्यापीठ व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यातील सामंजस्य कराराचा उल्लेख केला होता.

त्यानंतर याच वर्षी मायकोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉ. रणवीर चंद्रा यांनी ट्रस्टच्या प्रक्षेत्रात जगातील दुसरे सेंटर ऑफ एक्सलन्स फार्म व्हाइब्ज बारामतीत उभारण्याचे घोषित केले होते.ऊसाच्या शेतीसाठी नवतंत्रज्ञानाचे हे वरदान ठरणार आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि बारामती अॅग्रिकल्चरल ट्रस्टच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत होणाऱ्या संशोधनामुळे उसासाठी खत व पाणी व्यवस्थापनात सेन्सर, उपग्रहाचा वापर वाढणार आहे. या तंत्राने उसाची उत्पादकता वाढ, जमीन पोत सुधारणा व खतांचा मर्यादित वापर शक्य आहे. तसेच क्षारयुक्त जमिनीतूनही शेतकरी चांगले उत्पादन मिळवू शकतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

या अभ्यासक्रमाविषयी बोलताना बारामती अॅग्रिकल्चरल ट्रस्टचे विश्वस्त व सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार म्हणाले, 'बारामती अॅग्रिकल्चरल ट्रस्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वतीने संयुक्तपणे चालू करण्यात येत असलेला 'ए. आय. फॉर अॅग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी अँड क्लायमेट चेंज' हा जागतिक अभ्यासक्रम आहे. हा ऑनलाईन अभ्यासक्रम असून २०२४ पासून सुरू केला जाणार आहे.

स्थानिक पातळीपासून जागतिक पातळीपर्यंत स्मार्ट अॅग्रिकल्चरघा अभ्यास करणारा हा एकल प्रयोग आहे. स्मार्ट अॅग्रिकल्चर म्हणजे कमी खर्चात शेतीचे उत्पादन व उत्पादनाची गुणवत्ता वाढविणे होय. शेती पिकांसाठी औषधे, पाणी आणि खतांचा कमी वापर करून, जमीन सूधारणा कशी करावी, याचा या अभ्यासक्रमात समावेश आहे. जमीन सुधारणा आणि उत्पादन वाढीचे हे तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांना पोचविणार आहोत.'

कृत्रिम बुद्धिमत्तेभोवती जग केंद्रित होत आहे. त्याचा वापर शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत.आमचे संशोधन, तंत्र व संकल्पना प्रत्यक्षात कसे कार्य करतील, हे येत्या कृषिक प्रदर्शनात सर्वांना बघण्यास मिळणार आहे.

- डॉ. अजित जावकर, संचालक,(कृत्रीम बुद्धीमत्ता), ऑक्सफर्ड विद्यापीठ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT