World record holder cycling women Preeti Mhaske of Pune is listed in Guinness Book sakal
पुणे

Pune Cyclist Preeti Maske : सायकलिंगमध्ये जागतिक विक्रमाला गवसणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अवयवदानाचा संदेश व जनजागृती करण्यासाठी देशाच्या पश्चिम टोकापासून ते पूर्वेच्या टोकापर्यंत सायकलने प्रवास करत पुण्यातील ४५ वर्षीय प्रीती म्हस्के यांनी एक विक्रम केला आहे. प्रतिकूल हवामान, खराब रस्ते, रस्ते दुरुस्तीचे काम, उंच शिखरे अशा सर्व परिस्थितीचा सामना करत तब्बल १५ दिवसांमध्ये त्यांनी हा प्रवास पूर्ण करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. त्यामुळे पुण्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

चार हजार किलोमीटरचा प्रवास

या मोहिमेअंतर्गत त्यांनी गुजरात ते अरुणाचल प्रदेशापर्यंत तीन हजार ९५५ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. दररोज त्या सरासरी १९ तास सायकल चालवत होत्या. कोणतीही अडचणी येऊ नये यासाठी ५ जणांचा चमू त्यांच्यासोबत होता.

पहिल्या महिला सोलो सायकलिस्ट

प्रीती यांनी वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग असोसिएशन (डब्ल्यूयूसीए) ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये’ भारताच्या पश्चिमेकडून पूर्वेपर्यंत सायकल चालवून प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला ‘सोलो सायकलिस्ट’ बनण्याचा मान मिळाला आहे.

पाच वर्षांपूर्वी सुरुवात

नैराश्‍य, मानसिक ताणावर मात करण्यासाठी प्रीती यांनी ५ वर्षांपूर्वी सायकलिंग सुरू केले. विविध मोहिमा आखल्या. मार्च २०२१ मध्ये ६ हजार कि.मी.हून जास्त अंतरांची सुवर्ण चतुर्भुज मोहीम, जून २०२२ मध्ये लेह ते मनाली ५५ तासात ४३० कि.मी., काश्‍मीर ते कन्याकुमारी आदी मोहिमांचा यामध्ये समावेश आहे.

लवकरच मिळणार प्रमाणपत्र

रेकॉर्डसाठी लागणारी सर्व कागदपत्रे, पुरावे, टाइम स्टॅम्प चित्रे, डब्ल्यूयूसीए गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे स्वीकारली गेली आहेत. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण होताच त्यांना लवकरच प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

येथून केला प्रवास

गुजरात, राजस्थान, यूपी, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेशपासून सुरू करून त्यांनी ईशान्येकडील ७ राज्यांतून प्रवास केला. तर १५ नोव्हेंबर रोजी त्यांनी भारत-तिबेट सीमेवरील अरुणाचल प्रदेशातील किबिटू येथे देशाच्या पूर्व टोकावर ही मोहीम पूर्ण केली.

अरुणाचलमध्ये सायंकाळी हाडे गोठविणाऱ्या थंडीत सायकल चालवणे कठीण होते. त्यात पुरेसे उबदार कपडेही नव्हते. रस्ते, नेटवर्क नसल्यामुळे रात्री रस्ते चुकल्याने प्रवासालाही विलंब होत होता. परंतु सर्व अडचणी, समस्यांवर मात करत ही मोहीम यशस्वी झाली. सीमा रस्ता संघटनेचेही याकामी खूप सहकार्य मिळाले.

- प्रीती म्हस्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांची 'चूक' अन् जेमिमा रॉड्रीग्जचे सदस्यत्व Khar Gymkhana club ने केलं रद्द

Google Pixel 8 Discount : गुगल पिक्सेल 8 फोनवर मिळतोय चक्क 38 हजारचा डिस्काउंट; काय आहे खास ऑफर? कुठे खरेदी कराल बघा

३१ ऑक्टोबरच्या आधी सांगतो...! MS Dhoni च्या मनात नेमकं चाललंय काय? CSK च्या गोटातून मोठे अपडेट्स

Baba Siddique: बाबा सिद्दिकींच्या हत्येचं पाकिस्तान कनेक्शन? मोठी माहिती समोर, आतापर्यंत १० जणांना अटक

'भारताची महासत्तेकडे वाटचाल ते समान नागरी कायदा..'; पट्टणकोडोलीत भाकणूक सांगताना काय म्हणाले फरांडेबाबा?

SCROLL FOR NEXT