World Sparrow Day Sakal
पुणे

World Sparrow Day 2024 : या चिमण्यांनो परत फिरा

हल्ली गावांमध्ये किंवा पुण्यासारख्या शहरांमध्ये चिमणीच्या चिव चिवाटाणे सुरू होणारा दिवस फारसा अनुभवता येत नाही. याचे कारण त्यांची घटत असलेली संख्या

शीतल बर्गे

World Sparrow Day : हल्ली गावांमध्ये किंवा पुण्यासारख्या शहरांमध्ये चिमणीच्या चिव चिवाटाणे सुरू होणारा दिवस फारसा अनुभवता येत नाही. याचे कारण त्यांची घटत असलेली संख्या. खरंतर भारतात सगळीकडेच सर्वात जास्त संख्येने सापडणार , विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि सतत नजरेस पडणारा पक्षी म्हणजे चिमणी .

परंतु शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसते आहे .चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात चिमण्या मारण्याचे अभियान सुरू झाले होते. परंतु पर्यावरणा पुढचे धोके लक्षात आल्यानंतर जगभरात 'चिमणी जगायला हवी 'याची जाणीव होऊन २०१० पासून' २० मार्च 'हा दिवस 'जागतिक चिमणी दिवस 'म्हणून साजरा केला जाऊ लागला.

अगदी लहान असल्यापासूनच ज्या पक्षाची ओळख करून दिली जाते, ती म्हणजे चिऊताई कारण लहान मुलांना घरातील मंडळी 'चिऊताई आणि कावळे दादाची 'गोष्ट आवर्जून सांगतात आणि आपल्या अंगणामध्ये नाचणारी, घराच्या अवतीभोवती उडणारी,

चिवचिवाट करणारी चिऊताई सगळ्याच मुलांची लाडकी असते .परंतु हल्लीच्या दिवसांमध्ये शहरातूनच नव्हे तर ग्रामीण भागातूनही चिमण्यांची संख्या दिवसें दिवस कमी होऊ लागली आहे.याचे कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आणि त्याचबरोबर वाढणारे सिमेंटचे जंगल.

असे जरी असले तरी पुणे शहरातील आयटी हब म्हणून नावारूपाला आलेले शहर म्हणजे 'बाणेर -बालेवाडी' . या ठिकाणी अजूनही चिमण्या पाहायला मिळतात. बालेवाडी येथे अष्टविनायक चौकात रस्त्याच्या बाजूला एक मोठे बाभळीचे झाड आहे.

या झाडावर शेकडो चिमण्या पाहायला मिळतात .सकाळी व संध्याकाळी येथे चिमण्यांचा चिवचिवाट कानावर पडला की, आपोआपच या झाडाकडे लक्ष जाते . त्याचं प्रमाणे बालेवाडीतील एन आय ए.( नॅशनल इन्शुरन्स ॲक्याडमी) येथे ही खूप झाडे असून मोठ्या प्रमाणत चिमण्या व इतर पक्षी पहायला मिळतात.

या भागात पूर्वी शेत जमीन होती. त्यामुळे त्या वेळची काही मोठी झाडे अजुनही आहेत.अशाच झाडांवर पक्षी घरटी करतात.त्यामुळे अशा झाडांचे संवर्धन होणे गरजेचे असून या साठी महापालिकेनेही उपाययोजना करणे गरजेचे आहे .

चिमण्यांची संख्या घटल्याने "या चिमण्यांनो परत फिरा रे ....."अशी साद घालण्याची वेळ आपल्यावर येऊन पोहोचली आहे .यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, घरटी बांधून, अन्न पाण्याची सोय करणे हे महत्त्वाचे काम आपण सर्वजण एक सामूहिक जबाबदारी म्हणून अगदी घरच्या घरीही करू शकतो .त्याचबरोबर महापालिकेनेही यामध्ये पुढाकार घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे .जेणेकरून या लुप्त होत चाललेल्या प्रजातींना आपल्याला वाचता येईल.

चिमण्यांचे संरक्षण आणि अधिवास जतन-

१). घराच्या छतावर किंवा घरामध्ये गॅलरीमध्ये मोकळ्या जागी पाण्याची आणि त्यांच्या खाण्याची व्यवस्था करावी .

२).घराच्या आजूबाजूला जास्तीत जास्त झाडे लावावी ,जेणेकरून त्यांच्यातील फळे , झाडावरील कीटक खाऊन चिमण्या जगू शकतील .

३).जर बाल्कनीमध्ये चिमणी घरटे करत असेल तर ते काढण्याऐवजी त्याला संरक्षण द्या.

४). चिमण्यांनी घरट्यामध्ये अंडी घातली असतील तर ,त्याचे व पिल्लाचे कावळ्यापासून किंवा इतर पक्षां पासून रक्षण करा .

५). शेतातली किंवा नदी काठा वरील झाडांचे संवर्धन करणे.

अशा प्रकारे अन्न साखळी मधील महत्त्वाचा भाग असणाऱ्या नामशेष होत असलेल्या चिमणीला आपण नामशेष होण्या पासून वाचवू या.

माझ्या घरामध्ये गेल्या वर्षभरापासून चिमणीच्या एका जोडप्याने घरट केले आहे, घरात सुरक्षित वाटत असल्यामुळे ते घरातील एक सदस्य बनून राहिले आहेत . सध्या घरट्यातून पिलांचा आवाज पण ऐकू येत आहे.

- अनुराधा जगताप. परफेक्ट टेन सोसायटी , बालेवाडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT