worst condition of Sahyadri ground due to leakage of sewage 
पुणे

सांडपाणी वाहिनी गळतीमुळे सह्याद्री मैदानाची दूरावस्था

सागर कुलकर्णी

पर्वती(पुणे) : पर्वती दर्शन येथे महापालिकेचे सह्यादी मैदान आहे. या मैदानावर रोज सकाळी मुले खेळायला येतात. जेष्ठ नागरिकही याठिकाणी व्यायामासाठी येतात. महापालिकेकडून याठिकाणी व्यायामासाठी साहित्य बसवण्यात आलेले आहे. परंतू सध्या मैदानातील आतील भागाची दूरावस्था झालेली आहे.

मैदानात गेली दोन महिन्यांपासून पाणी साचत असल्याने चिखल होत आहे. याठिकाणी मैदानाच्या कोपऱ्यात शेजारील बिल्डींगच्या खालून सांडपाणी वाहिनी आलेली आहे. या सांडपाणी वाहिनीच्या गळतीमुळे मैदानावर पाणी साचलेले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मैदानाच्या कोपऱ्यातही पाण्याचे डबके तयार झाले असून याठिकाणी घाण पाण्यामुळे डास आणि दुर्गंधी पसरत चालली आहे. याचा त्रास येथील शेजारील नागरिकांना होत आहे. या सांडपाणी वाहिनीची समस्या ही गेली कित्येक दिवसांपासून आहे. यामध्ये महापालिकेचे अधिकारी सहाय्यक उपायुक्त भेटून गेलेले आहेत. परंतू कुठलीही चांगल्या प्रकारची दुरूस्ती झालेली नाही. याठिकाणी मैदानाच्या मागच्या बाजूला पर्वती दर्शन सोसायटी आहे. या सोसायटीच्या चेंबर गळतीमुळे हे होत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

महापालिका आणि पर्वती दर्शन सोसायटी यांच्या वादात मात्र शेजारील बिल्डींगच्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेडुन तात्पुरती दूरूस्ती करण्यात येते मात्र पाणी गळती अद्यापही चालू आहे.याठिकाणी मोठी वाहिनी टाकण्यात येऊन चेंबर दूरूस्त झाले तर ही गळती थांबु शकते.मैदानाच्या सीमाभितींतही रोज पाणी मुरूत आहे. पाणी मुरूल्यामुळे सीमाभींत कधीही पडण्याची शक्यता आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मैदानाच्या कडेला कचरा आणि राडारोडा साचलेला आहे.याठिकाणी ही सांडपाणी वाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी मनसेचे गणेश वाघचौडे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत क्षीरसागर आणि नागरिकांनी केली आहे.

"याठिकाणी मुंगुसाने येथील चेंबरच्या परिसर पोखरला आहे.गेली कित्येक दिवसांपासून ही समस्या आहे.पाणी साचल्यामुळे डास होत आहेत.लकवरात लवकर काम व्हावे.
- राजु पुणेकर, नागरिक

याठिकाणी सध्या बजेट नसल्यामुळे काम थांबले आहे.पर्वती दर्शन सोसायटी यांच्या तिथे बिघाड असल्याने गळती होत आहे.काम करण्यात येईल.
- शकंर खंडागळे अभियंता,पुणे महापालिका

देशातील मोठ्या ब्रॅंडच्या मधामध्ये चिनी साखरेची भेसळ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: अदानींच्या घरी झालेल्या अमित शहांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांनी सांगितली Inside Story...

Stock Market Crash: शेअर बाजारात पुन्हा भूकंप... सेन्सेक्स-निफ्टी कोसळले; अंबानीपासून अदानीपर्यंतच्या शेअर्समध्ये त्सुनामी

Sharad Pawar : शिवसेना शरद पवारांनीच फोडल्याचा छगन भुजबळांचा स्फोटक दावा; पवार यांनी दिले 'हे' प्रत्युत्तर

Latest Maharashtra News Updates : सुप्रीम कोर्टाचे अजित पवारांना निर्देश, शरद पवारांचे फोटो, व्हिडीओ वापरु नका

Sweater Care Tips: हिवाळ्यात स्वेटरचे नवेपण टिकवण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी

SCROLL FOR NEXT