Dilip band sakal
पुणे

Pune News : येरवड्यातील त्या जागेशी अजित पवारांचा संबंध नाही; विभागीय आयुक्त दिलीप बंड यांची माहिती

येरवडा येथील पोलिसांच्या तीन एकर जागेपैकी दोन एकर जागा अदलाबदलीत एका खासगी विकसकाला देण्याबाबतचा प्रस्ताव हा राज्याच्या गृह विभागाचा होता.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - येरवडा येथील पोलिसांच्या तीन एकर जागेपैकी दोन एकर जागा अदलाबदलीत एका खासगी विकसकाला देण्याबाबतचा प्रस्ताव हा राज्याच्या गृह विभागाचा होता. या प्रस्तावाशी पालकमंत्री अजित पवार यांचा संबंध नव्हता. राज्य सरकारने याबाबत सात वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती नेमली होती.

विभागीय आयुक्त या नात्याने या समितीचा मीसुद्धा सदस्य होतो आणि आमच्या समितीने एकमताने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती, असे पुण्याचे तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी मंगळवारी (ता.१७) एका खासगी वृतवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.

पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात या जागेच्या प्रस्तावाबाबत त्यांनी तत्कालीन आणि विद्यमान पालकमंत्री अजित पवार यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. / पार्श्‍वभूमीवर बंड यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

बंड पुढे म्हणाले, ‘येरवडा येथे पुणे पोलिसांची तीन जागा आहे. या जागेच्या आजूबाजूला एका खासगी विकासकाची जागा होती. त्यामुळे संबंधित विकासकाने त्याची जागा एकसलग करण्याच्या दृष्टीने या तीन एकरपैकी दोन एकर जागेची अदलाबदल करण्याची मागणी केली होती.

या जागेच्या बदल्यात तो पोलिसांची निवासस्थाने आणि मुख्य रस्त्यावर एक एकर जागेवर पोलिस ठाण्याची इमारत बांधून देणार होता. या प्रस्तावानंतर वरिष्ठ सात अधिकाऱ्यांची समिती नियुक्ती केली. या समितीने या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली. पुढे राज्य सरकारनेही हा प्रस्ताव मंजूर केला.

हा प्रस्ताव मंजूर होतेवेळी डॉ.. सत्यपाल सिंग हे पोलिस आयुक्त होते. त्यांनीही मंजुरी दिली होती. पुढे सिंग यांची बदली झाली. तोपर्यंत या जागेवरील कामाबाबतचा कार्यारंभ आदेश झाला होता. परंतु डॉ. सिंग यांच्या बदलीनंतर पोलिस आयुक्तपदी आलेल्या मीरा बोरवणकर यांचा या प्रस्तावास विरोध होता.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT