You may not know these things about Sassoon Hospital 
पुणे

ससून रुग्णालयाला ससून नाव कसे देण्यात आले; वाचा सविस्तर

रफिक पठाण (टीम ई-सकाळ)

पुणे: पुण्यातील ससून सर्वसाधारण रुग्णालय हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांपैकी एक रुग्णालय आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांतील नागरिक उपचारासाठी या रुग्णालयात येत असतात. सध्या 1500 बेड्सची व्यवस्था असलेले प्रशिस्त रुग्णालय महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे चालविले जाते. या रुग्णालयाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील टॉप 10 वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक असणारे बी.जे मेडिकल कॉलेजसुद्धा याच रुग्णालयाचा भाग आहे. 

ससून नाव कसे पडले:
19 व्या शतकातील मुंबईतील सुप्रसिद्ध ज्यू समाजसुधारक 'डेविड ससून' यांनी पुण्यात रुग्णालय बांधण्यास सढळ हाताने दान दिले. 1867 साली 144 रुग्णांची व्यवस्था होईल असे प्रशिस्त रुग्णालय पुण्यात ससून सरांच्या मदतीने बांधण्यात आले. त्यामुळे या रुग्णालयाला त्यांचे नाव देण्यात आले. ससून सरांच्या मदतीने व बयरामजी जीजीभॉय यांच्या अथक प्रयत्नातून पुण्यात पहिले वैद्यकीय महाविद्यालय ससून रुग्णालयाच्या आवारात 1878 साली बांधण्यात आले. या महाविद्यालयाला बयरामजी जीजीभॉय यांचे नाव देण्यात येऊन त्याचे बी.जे मेडिकल कॉलेज असे नामकरण करण्यात आले. 1946 साली बी.जे मेडिकल कॉलेजला पूर्णतः वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला. 

ससून रुग्णालयात कोणी-कोणी घेतलेत उपचार:
ससून रुग्णालय त्याच्या सुरवातीच्या काळापासूनच खूप प्रसिद्ध आहे. कारण ससून रुग्णालयात अनेक महत्वाच्या व्यक्तींवर उपचार करण्यात आले आहेत. व तसेच अनेक मोठ्या लोकांचा याठिकाणी जन्म सुद्धा झाला आहे. 

मेहेर बाबा: स्वतःला दैवी अवतार मानणारे पुण्यातील 20 व्या शतकातील सुप्रसिद्ध इराणी मेहेर बाबा यांचा जन्म ससून रुग्णालयात 25 फेब्रुवारी 1894 साली झाला. 

हजरत बाबाजान: मूळच्या अफगाणिस्थानच्या असलेल्या हजरत बाबाजान यांनी त्यांच्या आयुष्यातील 25 वर्षे पुण्यात वास्तव्य केले. पुण्यातील प्रमुख मुस्लिम संतांपैकी एक म्हणून त्यांचा नामउल्लेख केला जातो. पुण्यातील त्यांची दर्गाह आज सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. हजरत बाबाजान यांच्यावर 18 सप्टेंबर 1931 रोजी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची नोंद आहे. 

महात्मा गांधी: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सुद्धा ससून रुग्णालयात उपचार घेतले आहेत. महात्मा गांधींवर ससून रुग्णालयात अपेंडिक्सची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 12 जानेवारी 1924 रोजी गांधीजींवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 

रमण राघव: 70 च्या दशकातला कुख्यात गुन्हेगार रमण राघव याचा मृत्यू देखील ससून रुग्णालयात झाला आहे. सिरीयल किलिंगच्या प्रकरणात तो पुण्यातील येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना 7 एप्रिल 1995 ला त्याचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. 

मीना कुमारी: 50 च्या दशकातली सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून मीना कुमारी खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक महत्वाचे चित्रपट केले आहेत. महाबळेश्वरमधील शूटिंग संपवून मुंबईला परतत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. त्यांना 21 मे 1951 रोजी उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

आजही ससून रुग्णालय अनेक कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. सध्या कोरोनाच्या महामारीत पुण्यातील अनेक भागातील रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनावर उपचार म्हणून केले जाणारे प्रयोग याच रुग्णालयात केले जात आहेत. सध्या बीसीजी लस, प्लाज्मा थेरेपी यासारख्या उपचाराचा वापर कोरोना रुग्णांवर करण्याचा प्रयत्न ससून रुग्णालयात केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

Latest Marathi News Updates : अजित पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांच्या देवगिरी बंगल्यावर फेऱ्या

SCROLL FOR NEXT