Rape Sakal
पुणे

तळजाई टेकडीवर तरुणीवर दारू पिऊन बलात्कार

वाढदिवसांच्या पार्टीसाठी बोलावून तरुणीला तळजाईच्या जंगलात नेले. तेथे दारु पिल्यानंतर तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

सहकारनगर - वाढदिवसांच्या पार्टीसाठी बोलावून तरुणीला तळजाईच्या जंगलात नेले. तेथे दारु पिल्यानंतर तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी युवकाला अटक केली आहे. शुभम सिताराम शिंदे (वय १९, रा. सह्याद्रीनगर, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कात्रज येथील एका २२ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शुभम याने फिर्यादी तरुणीला ५ डिसेंबर रोजी वाढदिवसाची पार्टी आहे, तू तळजाई शेवटचा बसस्टॉप येथे ये, असे सांगितले. त्याप्रमाणे ती सायंकाळी ५ वाजता तेथे आली. आरोपीने त्याचा मित्र प्रतिक माने व फिर्यादी यांना तळजाई येथील जंगलात नेले. तेथे ते दोन ते अडीच तास दारु पित बसले होते. फिर्यादी तरुणीला थंडी वाजत असल्याने ती कडेला झोपली असताना शुभम याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती तिने सहकारनगर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी शुभम याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT