suside.jpg 
पुणे

मनाला चटका लावणारी बातमी : गड्या एक दिवस थांबायच होतंस !

सकाळवृत्तसेवा

पुणे : त्याला सर्दी, खोकला अन ताप होता, दवाखान्यात गेल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून त्याच्या घशातील द्रवाचे नमूने घेण्यात आले. रुग्णालयात ठेवण्यात आले, पण त्याने कोरोनाच्या भितीपोटी आत्महत्या केली. आज आलेला त्याचा कोरोनाचा अहवाल होता "निगेटीव्ह". तो फक्त एक दिवस थांबला असता तर ! 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खडकी परिसरात राहणाऱ्या एका तरुणास सर्दी, खोकला व ताप अशी लक्षणे होती. त्यामुळे तो गुरुवारी दुपारी रुग्णालयात तपासणीसाठी गेला होता. तेथे त्याचे कोरोना तपासणीसाठी घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. दरम्यान, त्यास श्वास घेण्यास अचानक त्रास होऊ लागल्याने बोपोडी येथील खेडेकर रुग्णालयात हलवण्यात आले.  त्याचा कोरोना तपासणी अहवाल शुक्रवारी येणार होता. मात्र आपल्याला कोरोना झाला आहे, अशी त्यास भिती वाटत होती.

दरम्यान गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता पावसामुळे वीज गेली होती, त्यामुळे काही क्षणात पडलेल्या अंधाराचा फायदा घेऊन हा तरुण रुग्णलयाच्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवर गेला आणि तेथून उडी मारुन त्याने आत्महत्या केली.

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा कोरोना तपासणी अहवाल शुक्रवारी संध्याकाळी आला. त्या तरुणाचा अहवाल "निगेटीव्ह" आल्याचे खडकी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) शफीक पठाण यांनी सांगितले. "निगेटीव्ह" म्हणजे त्याला कोरोना नव्हता. कोरोना अहवाल दुसऱ्या दिवशी येतो, किमान त्याचा रिपोर्ट काय होता, हे या तरुणाने जाणून घेतले असते, एक दिवस थांबला असता तर कदाचित त्याचा जीव वाचला असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाहीत, प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

IND vs AUS: ऋषभ पंतच्या बॉलिंगवर जसप्रीत बुमराहची फटकेबाजी! पाहा हा BCCI ने पोस्ट केलेला स्पेशल Video

१० पैकी १०! Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने डावात दहा बळी टिपले, Ranji Trophy त ३९ वर्षानंतर असे घडले

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

SCROLL FOR NEXT