Zika Virus sakal
पुणे

Zika Patient : शहरात झिकाचे आणखी तीन रुग्ण; एकूण संख्या १५

पाषाण परिसरातील दोन गर्भवती आणि उजवी भुसारी कॉलनीतील १५ वर्षांचा मुलगा अशा तीन जणांना झिका विषाणूच्या संसर्गाचे निदान मंगळवारी झाले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पाषाण परिसरातील दोन गर्भवती आणि उजवी भुसारी कॉलनीतील १५ वर्षांचा मुलगा अशा तीन जणांना झिका विषाणूच्या संसर्गाचे निदान मंगळवारी झाले. त्यामुळे शहरातील झिकाच्या रुग्णांची संख्या पंधरापर्यंत वाढल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर घरातच उपचार सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

आतापर्यंत एरंडवणे, मुंढवा, डहाणूकर कॉलनी, पाषाण, आंबेगाव बुद्रूक, खराडी आणि कळस या भागात रुग्ण आढळले आहेत. त्यात आठ गर्भवतींचा समावेश आहे. गर्भवतींचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

दोन तरुणींना संसर्ग असल्याचे निदान प्रयोगशाळेतील अहवालातून स्पष्ट झाले. एक तरुणी १८ वर्षांची असून ती २८ आठवड्यांची गर्भवती आहे. दुसऱ्या तरुणीचे वय १९ असून ती २३ आठवड्यांची गर्भवती आहे. त्यांना सांधेदुखी आणि डोकेदुखी ही ठळक लक्षणे दिसत होती. त्यांचा घसा खवखवत होता. त्यामुळे त्यांचे रक्तनमूने तपासण्यासाठी घेण्यात आले होते.

दृष्टिक्षेपात संसर्ग

  • पुरुष - ४

  • महिला - ११

  • गर्भवती - ८

  • सर्वेक्षण केलेली लोकसंख्या - ४२,७५९

  • अळी सर्वेक्षण केलेली घरे - १३,००४

  • अळी आढळलेली घरे - ३५४

लक्षणे

  • ताप

  • पुरळ

  • डोकेदुखी

  • सांधेदुखी

  • डोळे लाल होणे

  • स्नायूदुखी

झिका कसा पसरतो?

झिका हा विषाणू एडिस इजिप्ती या प्रजातीच्या डासांच्या मादीमुळे पसरतो. लैंगिक संबंध किंवा गर्भवतींकडून बाळाला झिकाचा संसर्ग होतो.

प्रतिबंधात्मक उपाय

  • डासोत्पत्ती टाळणे

  • डास चावू नयेत याची काळजी

  • लांब बाही असलेले शर्ट आणि लांब पँट वापरणे

  • घरापाशी पाणी साचू देऊ नका

उपचार कसे करतात?

झिकावर निश्चित उपचार नसल्याने रुग्णाला दिसणाऱ्या लक्षणांवर औषधे दिली जातात. भरपूर पाणी पिणे, पुरेशी विश्रांती आणि सात्त्विक आहार यातून रुग्ण बरे होऊ शकतो.

शहरात झिकाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वेक्षणाचा वेग वाढविला आहे. रुग्ण आढळलेल्या भागातील गर्भवतींच्या तपासणीला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांमध्ये गर्भवतींचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. सर्वेक्षण चांगले होत असल्याने रुग्ण लवकर उपचाराखाली येत आहेत. गर्भवतींमधील संसर्गाचा धोका टाळण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गर्भवतींचे सर्वेक्षण आणि संशयितांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच मुंढवा, पाषाण, खराडी आणि कळस परिसरातील ३१ महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेकडे पाठवले आहेत.

- डॉ. कल्पना बळीवंत, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Strike Rate: महायुतीचा जबरदस्त स्ट्राइक रेट! काय ठरले निर्णायक? विरोधकांचं झालं पानीपत

Latest Maharashtra News Updates : महायुतीचं निर्विवाद वर्चस्व! देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Maharashtra Assembly Election Result: पुण्यातील 'या' मतदारसंघात अनेक वर्षांची परंपरा कायम; जनतेचा कौल नव्या आमदाराकडेच

Hemant Soren : झारखंडचा गड सोरेन यांनी राखला...इंडिया आघाडीला दोन तृतीयांश बहुमत; भाजपचा रथ रोखला

SCROLL FOR NEXT