Zika Virus esakal
पुणे

Zika Virus : पुण्यात झिकाचे आणखी दोन नवीन रुग्ण; रुग्णांची संख्या अकरावर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरात झिका विषाणूचा संसर्ग झालेले आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंत झिकाच्या रुग्णांची संख्या ११ झाली आहे. यापैकी पाच गर्भवती आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे रविवारी (ता. ७) देण्यात आली.

शहरात गेल्या काही दिवसांपर्यंत एरंडवणे या एकाच भागात झिकाचे चार रुग्ण आढळले होते. त्यातील दोन गर्भवती महिला आहेत. पाठोपाठ मुंढव्यातील कोद्रे वस्ती परिसरात दोन रुग्णांना झिकाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्यामध्येही एक गर्भवतीची नोंद झाली. डहाणूकर कॉलनी, पाषाण, आंबेगाव बुद्रूक या परिसरातही एका पाठोपाठ एक नवीन रुग्ण आढळले. त्यातील पाषाण आणि आंबेगाव बुद्रुकमधील दोन रुग्ण गर्भवती आहेत. त्यामुळे झिकाचा संसर्ग झालेल्या गर्भवतींची संख्या पाचपर्यंत वाढली आहे. आता कर्वेनगर आणि खराडी परिसरात दोन जणांना झिकाचा संसर्ग झाला आहे.

कर्वेनगरमधील एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या ४२ वर्षीय महिलेला झिकाचा संसर्ग झाला असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. त्यांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ताप येत होता. त्यामुळे रुग्णालयाने तिच्या रक्त आणि लघवीचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविले होते. त्याचा अहवाल नुकताच मिळाला. त्यातून रुग्णाला झिकाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले.

सध्या या महिलेची प्रकृती व्यवस्थित आहे. दरम्यान, खराडीमध्ये दुसरा रुग्ण आढळला. तेथील २२ वर्षीय मुलाला झिकाचा संसर्ग झाला आहे. त्याला गेल्या काही दिवसांपासून ताप येत होता. त्याच वेळी अंगावर लाल पुरळ आले होते. ही लक्षणे दिसून आल्याने त्याचे नमुने तपासणीसाठी ‘एनआयव्ही’ला पाठविण्यात आले होते. त्यातून या रुग्णाचे निदान झाल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

शहरात झिकाच्या नवीन रुग्णांचे निदान होत असल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आतापर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागातील रुग्णांमध्ये झिकाचा संसर्ग आढळल्याने या आजाराचे सर्वेक्षण वाढविण्यात आले असल्याचेही विभागातर्फे सांगण्यात आले.

डासोत्पत्ती होणार नाही, याची काळजी घ्या

शहरात झिकाचे रुग्ण आढळले असले तरीही त्यामुळे कोरोनाप्रमाणे याचा प्रसार होत नाही. हा किटकजन्य आजार आहे. एडिस एजिप्ती या डासाच्या प्रजातीमधून त्याचा संसर्ग होतो. त्यामुळे नागरिकांनी डासोत्पत्ती होणार नाही, याची प्रकर्षाने काळजी घ्यावी. पुणेकरांनी या आजाराची भीती बाळगण्यापेक्षा आपल्या घरात आणि परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही, याची प्रकर्षाने काळजी घेण्याचे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पठ्ठ्यानं 31000 करोडला विकली कंपनी अन् कर्मचाऱ्यांना 40 कोटींचा फायदा, कोण आहेत तो भारतीय उद्योगपती?

Navratri 2024: मुलींना वयाच्या ५ व्या वर्षी शिकवाव्यात 'या' महत्वाच्या गोष्टी, प्रत्येक आई-वडीलांची जबाबदारी

Amazon Prime Free : ॲमेझॉन प्राईमवर पैसे खर्च न करता एंटरटेनमेंट हवंय? फ्रीमध्ये मिळणार सबस्क्रिप्शन, वापरा 'या' स्मार्ट ट्रिक्स

अरे भाऊ...! भारतीय फलंदाजांच्या फटकेबाजीवर कॅप्टन Suryakumar Yadav इम्प्रेस, भन्नाट Video

Rhea Chakraborty : ड्रग्स घोटाळ्यातून सुटते न सुटते तोच रिया अडकली पुन्हा संकटात ! 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

SCROLL FOR NEXT