Punjab Rajya Sabha Election esakal
Punjab Assembly Election 2022

Punjab : राघव चढ्ढासह हरभजन सिंग राज्यसभेवर जाणार!

सकाळ डिजिटल टीम

31 मार्च रोजी पंजाबमधील राज्यसभेच्या 5 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

पंजाबमधील (Punjab) सातपैकी पाच जागांसाठी 31 मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) शिक्षणतज्ज्ञ संदीप पाठक, दिल्लीचे आमदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांची उमेदवारी AAP नं जाहीर केलीय.

पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjab Assembly Election) घवघवीत यश मिळवल्यानंतर आम आदमी पार्टी आता राज्यसभा निवडणुकीची तयारी करत आहे. वास्तविक, 31 मार्च रोजी पंजाबमधील राज्यसभेच्या 5 जागांसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, राघव चढ्ढा यांची राज्यसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यांचं वय 33 वर्षे आहे.

जर चड्ढा राज्यसभेत पोहोचले तर ते देशातील सर्वात तरुण राज्यसभा खासदार असतील. याआधी 35 वर्षीय मेरी कोम सर्वात तरुण खासदार ठरली होती. पंजाबमध्ये 117 पैकी 92 जागा 'आप'नं जिंकल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीत 'आप' 5 जागा जिंकू शकेल, असं मानलं जातंय.

राघव चड्ढा 2020 मध्ये दिल्लीच्या राजेंद्र नगर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वी त्यांनी पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहिलंय. दरम्यान, पंजाब विधानसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधी राघव चढ्ढा यांना सहप्रभारी म्हणून पाठवण्यात आलं होतं.

'आप'चे 5 उमेदवार निश्चित

आपचे चार उमेदवार जवळपास निश्चित मानले जात आहेत. पंजाबमधून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी चढ्ढा यांच्याशिवाय प्राध्यापक संदीप पाठक यांच्या नावाचाही विचार केला जात आहे. याशिवाय, क्रिकेटपटू हरभजन सिंगही पंजाबमधून राज्यसभेचा उमेदवार असेल. तसेच लव्हली विद्यापीठाचे कुलपती अशोक कुमार मित्तल आणि संजीव अरोरा यांनाही उमेदवारी देण्यात आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT