राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी 'या' निवडणुकीत आपला चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पार्टीनं (Aam Aadmi Party) पंजाबमध्ये (Punjab Election Result) एकहाती सत्ता मिळवलीय. निवडणूक आयोगानं दिलेल्या आकेडावारीनुसार, पंजाबमध्ये आप पक्षाला 92 जागा मिळाल्या आहेत.
आपच्या झंझावातापुढं सत्ताधारी काँग्रेसचा (Congress) सुपडा साफ झालाय. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर अकाली दल आणि भाजपची अवस्था दयनीय अवस्था झालीय.
निवडणूक आयोगानं दिलेल्या आकडेवारीनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला 92 जागांवर विजय मिळवला आहे. सत्ताधारी काँग्रेसला फक्त 18 जागांवर समाधान मानावं लागलं.
शिरोमणी अकली दल पक्षाला तीन जागा, तर बहुजन समाजवादी पार्टीला एक, भाजपला दोन जागा मिळाल्या आहेत. तर एका जागेवर अपक्ष उमेदवारानं बाजी मारलीय. 117 विधानसभा जागा असणाऱ्या पंजाबमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 59 जागांची गरज आहे. तर, गोव्यात आपनं दोन जागांवर यश मिळालंय.
पंजाब विधानसभा जिंकलेल्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा (National Party) दर्जा मिळवण्यासाठी पुढील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या एका माजी अधिकाऱ्यानं सांगितलं की, राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी पक्षाला चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष बनणं आवश्यक आहे. आम आदमी पार्टी दिल्ली आणि पंजाबमध्ये आधीच 'प्रादेशिक' बनलीय. दिल्लीत सत्तेवर आणि आता पंजाब निवडणुकीतील नेत्रदीपक कामगिरीनंतर इथंही सत्तेवर येणार आहे.
आयोगाचे माजी अधिकारी म्हणाले, कोणत्याही पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी आठ टक्के मतं आवश्यक असतात. यासाठी विविध पर्याय देखील आहेत. विधानसभा निवडणुकीत एखाद्या पक्षाला सहा टक्के मतं आणि दोन जागा मिळाल्यास त्याला प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळू शकतो. तसेच प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळवण्याचा दुसरा पर्याय म्हणजे, विधानसभेत कितीही मताधिक्य असलं तरी किमान तीन जागा मिळणं आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीतील कामगिरीबाबतही तरतुदी आहेत. परंतु, त्या 2024 मध्ये होणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या ताज्या ट्रेंडनुसार, गोवा विधानसभा निवडणुकीत 'आप'ला 6.77 टक्के मतं मिळाली आहेत. हिमाचल प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ 8 जानेवारी 2023 पर्यंत आहे, तर गुजरात विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी 18 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. या दोन्ही निवडणुका या वर्षाच्या शेवटी किंवा 2023 च्या सुरुवातीला होऊ शकतात. गुजरात (Gujarat) आणि हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) निवडणुका जिंकण्यासाठी आपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, सध्या आठ राष्ट्रीय पक्ष आहेत. तृणमूल काँग्रेस (TMC), बहुजन समाज पार्टी (BSP), भारतीय जनता पार्टी (BJP), भारतीय कम्युनिस्ट पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) आणि नॅशनल पीपल्स पार्टी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.