PM Modi  E sakal
Punjab Assembly Election 2022

Punjab : 'युपी-बिहार के भैया' विधानावर मोदींचा चन्नी, प्रियंका गाधींवर हल्लाबोल

पंजाबच्या रुपनगर येथील एका सभेत बोलताना मोदींनी ही टीका केली आहे.

निनाद कुलकर्णी

चंदीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर 'यूपी, बिहार के भैये' या विधानावर टीका करत जोरदार हल्लाबोल केला आहे. “यूपी, बिहारच्या भैयांना पंजाबमध्ये येऊ देऊ नका.” असे विधान चन्नी यांनी केले होते. त्यांच्याया टिप्पणीनंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी त्यांच्या शेजारी उभ्या राहून टाळ्या वाजवत असल्याची टीका देखील मोदी यांनी केली आहे. त्यामुळे अशी विधाने करून काँग्रेस संत रविदासांचा अपमान करत असल्याचे मोदी म्हणाले. पंजाबच्या रुपनगर येथील एका सभेत बोलताना मोदींनी ही टीका केली आहे. (PM Modi Attack On Punjab CM Channi On ‘UP, Bihar ke bhaiya’ Remark)

'संत रविदास यांचा जन्म कुठे झाला? असा प्रश्न उपस्थित करत संत रविदास यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला होता आणि तुम्ही म्हणताय की, युपी बिहारच्या भैयांना येथे येऊ देऊ नका. अशा फुटीरतावादी मानसिकतेच्या लोकांना पंजाबवर क्षणभरही राज्य करू देऊ नका असे आवहन मोदी यांनी यावेळी उपस्थित जनतेला केले आहे. काँग्रेसने नेहमीच शेतकऱ्यांची फसवणूक केला असून, याला इतिहास साक्षीदार असल्याचा घाणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ज्यांनी तुम्हाला दिल्लीत प्रवेश करण्यास अडवले तेच लोक आता मतं मागण्यासाठी तुमच्याकडे येत आहे, परंतु, अशा लोकांना पंजाबमध्ये काही करण्याचा अधिकार आहे का? असा सवाल मोदींनी यावेळी उपस्थित केला.

मोदी म्हणाले की, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. मात्र, काँग्रेसचे सरकार नेहमीच खोटे बोलत राहिले. परंतु, ज्यावेळी केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाले तेव्हा आम्ही या शिफारशी लागू करण्याचे काम केल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. पंजाबमधील शेतकऱ्यांना नवीन विचार आणि दृष्टी असलेले सरकार हवे असल्याचे सांगत शेतकऱ्याला चांगले पीक, कमी खर्च आणि चांगला भाव हवा आहे. यासाठी भजपचे सरकार बियाण्यांपासून बाजारपेठेपर्यंत एक नवीन प्रणाली तयार करत असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेसच्या धोरणांमुळे येथे नवीन उद्योग येत नसल्याचे सांगत, केवळ दुहेरी इंजिन असलेले सरकार ही परिस्थिती बदलू शकते असा विश्वसा देखील मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकारने पंजाबमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ३,७०० कोटी रुपये जमा केले आहेत. पंजाबमधील सुमारे २३ लाख शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळाला असल्याचे देखील यावेळी मोदींनी सांगितले.

पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी येत्या 20 फेब्रुवारीला मतदान पार पडणार असून, येथील प्रचार सभांनी चांगलाच जोर धरला आहे. अनेक राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्योरोपांच्या फैरी झाडण्यात येत असून, एकूणच येथील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT