AAP In Punjab Assembly Election Sakal
Punjab Assembly Election 2022

पंजाबमध्ये 'आप आये बहार आई' गाणं वाजण्यामागची पाच कारणं...

काँग्रेसच्या चन्नी सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण झाले होते.

निनाद कुलकर्णी

Punjab Assembly Election Result Live Updats : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या सुरुवातीच्या ट्रेंडवरून आम आदमी पार्टी राज्यात स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत पक्षाचा निवडणूक अजेंडा बेरोजगारी, अंमली पदार्थांच्या व्यापाराला आळा घालणे, भ्रष्टाचारमुक्त सरकार यासारख्या आश्वासनांवर केंद्रित होता. पक्षानेही दिल्लीचा आदर्श दाखवून मतदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. पंजाबमध्ये परंपरागतपणे काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाचे वर्चस्व राहिले आहे. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी होती.

काँग्रेस, आप, शिरोमणी अकाली दल-बसपा युती आणि भाजप-पंजाब लोक काँग्रेस आघाडीने बहुतांश जागांवर लढती बहुकोणीय बनवल्या होत्या. निवडणुकीच्या अवघ्या महिनाभरापूर्वी 'आप'ने संगरूरचे खासदार भगवंत सिंह मान यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केले होते. मान हे राज्यातील मालवा प्रांतातील एक लोकप्रिय शीख चेहरा आहे.

पंजाबमध्ये 'आप' च्या उदयाची मुख्य कारणे

सत्ता-विरोधी मतः काँग्रेसच्या चन्नी सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण झाले होते. यामुळे सत्ताविरोधी एकत्र आले. पंजाबमध्ये काँग्रेसला ना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देता आले, ना अंमली पदार्थांच्या व्यसनातून मुक्तता करता आली. भ्रष्टाचार हाही मुद्दा आहे तसाच राहिला. त्याशिवाय बेरोजगारी ही मोठी समस्या बनली आहे. 2017 मध्ये, काँग्रेसने शिरोमणी अकाली दलाच्या सरकारला आव्हान देण्यासाठी घरोघरी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. ती पूर्ण करण्यात काँग्रेस पूर्णपणे अपयशी ठरली. 2021 च्या अखेरीस पंजाबमधील बेरोजगारीचा दर 7.85 टक्के इतका होता.

काँग्रेसमधील कलह : पंजाब काँग्रेसमध्ये जे घडले ते कोणापासून लपलेले नाही. काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वातील गटबाजी थांबलेली नाही. त्यामुळे त्यांच्या मतांच्या टक्केवारीवर विपरीत परिणाम झाला आहे. अमरिंदर सिंग यांचा राजीनामा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये घेण्यात आला होता. त्यामुळे शीख जनताही काही प्रमाणात काँग्रेसवर नाराज होती. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी आणि सुनील जाखड यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्यांमुळे पक्षाची प्रतिमा डागाळली आणि त्याचा फटकापण यामध्ये दिसून आला.

दिल्ली मॉडेल : आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली मॉडेलचे स्वप्न दाखवून पंजाबच्या मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने तीन जागा जिंकून आपले अस्तित्व निर्माण केले होते. त्यावेळी दिल्लीत 'आप'ला एकही जागा मिळाली नव्हती. तेव्हापासून 'आप'कडे पंजाबमध्ये काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाचा एक तगडा प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात होते.

आपचा निवडणूक अजेंडा : बेरोजगारी, अंमली पदार्थांचे व्यसन, भ्रष्टाचार यासारखे मुद्दे आपच्या 10 कलमी निवडणूक अजेंड्यामध्ये प्रमुख होते. 'आप'ने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात सरकारी शाळा आणि रुग्णालयांची स्थिती सुधारण्याचे आश्वासन दिले होते. दिल्लीतील आप सरकारने हे केले आहे, यामुळे जनतेचा विश्वासही त्यांनी मिळवला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासनही आपच्या बाजूने राहिले.

शेतकऱ्यांचा विरोध : केंद्रातील भाजप सरकारने 2020 मध्ये तीन कृषी कायदे आणले तेव्हा ते रद्द करण्यासाठी आंदोलन करण्यात पंजाबचे शेतकरी आघाडीवर होते. या मुद्द्यावर केजरीवाल पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून आले. आपचे नेते नियमितपणे धरणे स्थळांना भेटी देत होते. तसेच शेतकरी नेत्यांच्या आंदोलनाचे समन्वय साधत होते त्याचा फायदाही आपला झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT