Election Commission Confiscated Sonu Sood Car Team esakal
Punjab Assembly Election 2022

'अकाली दलाकडून...', निवडणूक आयोगानं गाडी जप्त केल्यानंतर सोनू सूदची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

चंदीगढ : आज पंजाबमध्ये ११७ जागांसाठी मतदान (Punjab Election 2022) पार पडत आहे. निवडणूक आयोगाने काही तक्रारीनंतर आज बॉलीवूड अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) गाडी जप्त केली. तसेच त्याला घरी पाठवण्यात आलं. त्यानंतर आता सोनू सूदने प्रतिक्रिया दिली आहे. (Election Commission Confiscated Sonu Sood Car)

विरोधकांकडून, विशेषत: अकाली दलाच्या लोकांकडून विविध बूथवर धमक्या आल्याची माहिती आम्हाला मिळाली. काही बूथवर पैसे वाटले जात आहेत. त्यामुळे निष्पक्ष निवडणुका व्हाव्या याचा तपास करणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच आम्ही घराबाहेर पडलो होतो. आता आम्ही घरी आहोत, असं सोनू सूदनं सांगितलं आहे.

सोनू सूदची गाडी का केली जप्त? -

सोनू सूदची बहिण माविका सूद या मोगामधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. पण, सोनू सूद हे मतदारांवर प्रभाव टाकत असल्याची तक्रार शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार बरजिंदर सिंग यांनी केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने सोनू सूदची गाडी जप्त केली.

दरम्यान, सोनू सूद एका मतदान केंद्रात जाण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान त्याची कार जप्त करून त्याला घरी पाठवण्यात आले. घरातून बाहेर पडल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा मोगा जिल्ह्याचे पीआरओ प्रभदीप सिंह यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजाराचा मूड बदलला; आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Latest Maharashtra News Updates : फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जावे लागेल?

Nagraj Manjule : खाशाबा जाधवांवरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; नागराज मंजुळेंविरोधात समन्स

Mumbai: दारु पडली महागात; तीन तरुणांचा मृत्यू, वाचा नक्की काय घडलं?

Eknath Shinde Resignation: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार? जाणून घ्या काळजीवाहू मुख्यमंत्री प्रक्रियेबद्दल

SCROLL FOR NEXT