charanjit-singh-channi esakal
Punjab Assembly Election 2022

दलित मुख्यमंत्री बनवण्याचा प्रयत्न फसला; काँग्रेसच्या बालेकिल्यात 'आप'चा झेंडा

'आप'च्या या यशाने पुन्हा एकदा काॅंग्रेसच्या पराभवावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Punjab Election Result 2022: पंजाब निवडणूक निकालांमध्ये आम आदमी (AAP) पक्षाला मिळालेल्या यशाने सर्वच पक्ष आश्चर्यचकित झाले आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पंजाबमध्ये 'आप'ने आपला झेंडा रोवला. आपच्या या यशाने पुन्हा एकदा काॅंग्रेसच्या पराभवावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पंजाबमध्ये (Punjab) गेल्या महिन्यात नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu)आणि कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांच्यात झालेल्या वाद-विविदामुळे दलित कार्ड खेळत पंजाबची कमान चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे सोपवली. मात्र या निकालानंतर काॅंग्रेसचे हे कार्ड सपशेल अपयशी झाले. चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi)यांनाही आपली जागा शाबूत ठेवता आली नाही.

'आप'ला मिळाल्या बंपर सीट्स

पंजाबमध्ये ३४ राखीव जागांसाठी ही निवडणूक लढवण्यात आली. त्यापैकी २६ जागा आम आदमी पक्षाने आपल्या ताब्यात मिळवल्या आहेत. तर, काँग्रेसच्या वाट्याला फक्त ६ जागा आल्या आहेत. याशिवाय अकाली दल आणि बसपा यांच्या युतीला फक्त २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे पंजाबमध्ये आपने गड राखला आहे.

दोन्ही जागांवरून चन्नी यांचा पराभव झाला

चरणजीत सिंह चन्नी यांनी चमकौर साहिब आणि भदौर या दोन विधानसभा जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र या दोन्ही जागांवर त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यावेळी मात्र काँग्रेसने दलित पत्ता टाकत पंजाबची निवडणूक कमान त्यांच्यावर सोपवली. पण पंजाबमध्ये त्यांना खात खोलता नाही आलं. एकंदरीत काँग्रेसचे दलित कार्डही त्यांना पुन्हा सत्तेत आणू शकले नाही असेही म्हणता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: कोपरी पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT