चंदीगढ : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागले. गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तरप्रदेश, उत्तराखंड या पाच राज्यांतील निकाल लागले असून पंजाब सोडता बाकीच्या चार राज्यात भाजपाने आघाडी मारली आहे. तसंच पंजाबमध्ये कॉंग्रेसच निवडून येण्याची दाट शक्यता असताना तिथे आम आदमी पार्टीने आघाडी घेतल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Punjab Assembly Election 2022 Result Updates)
दरम्यान पाच राज्यांपैकी चार राज्यांत भाजपाने आघाडी घेतली असून पंजाबमध्ये मात्र आपने आघाडी घेतली असल्याने हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी आम आदमी पक्षावर निशाना साधला आहे. आपने पंजाबमध्ये दारु वाटली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळेच पंजाबची जनता आपचे कौतुक करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
दरम्यान पंजाबमध्ये आपने ९२ जागांवर आघाडी मिळवली असून विजयाचा प्रबळ दावेदार असलेल्या कॉंग्रेसला अवघ्या १८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. आपकडून माण हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असताना आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये सभा घेऊन मुख्यमंत्रीपदासाठी भगवंतसिंग माण यांची घोषणा केली.
त्याबरोबर त्यांनी पंजाबच्या जनतेचे आभार मानले असून आता भारताच्या प्रगतीला कोणीही रोखू शकणार नाही असं आवाहन केलं. तसेच दर्जेदार शिक्षण देणार असल्याचं सांगताना त्यांनी भारतातील विद्यार्थ्यांना आता युक्रेनसारख्या देशात शिक्षणासाठी जावं लागणार नाही असा विश्वास जनतेला दाखवला.
त्यानंतर सरदार माण यांनी एक घोषणा केली आहे. त्यांनी बोलताना म्हटलंय की, आता इथून पुढे पंजाबच्या सरकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्याचा फोटो लागणार नाही. सरकारी कार्यालयात सरदार भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यात येईल. अशी घोषणा आप नेते आणि पंजाबचे भावी मुख्यमंत्री भगवंतसिंग माण यांनी केली. याबाबतची माहीती आपच्या अधिकृत ट्वीटरवरून शेअर करणयात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.