kejriwal road show Sakal
Punjab Assembly Election 2022

अनेक वर्षांनंतर पंजाबला मिळणार प्रामाणिक मुख्यमंत्री : केजरीवाल

पंजाबमधील ‘रोड शो’ वेळी केजरीवालांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा

अमृतसर : ‘‘अनेक वर्षांनंतर पंजाबला आता प्रामाणिक मुख्यमंत्री मिळणार आहे. आपला पक्ष राज्यात प्रामाणिक सरकार देईल,’’ असे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी आज केले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) प्रचंड बहुमत मिळविले. त्यांना ११७ पैकी ९२ जागांवर विजय मिळाला. त्यानंतर आज केजरीवाल आणि पक्षाचे नियोजित मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी येथे ‘रोड शो’ केला. या ‘रोड शो’ वेळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

‘‘तुसी कमाल कर दिता.... आय लव्ह यू पंजाब’, अशा शब्दांत केजरीवाल यांनी मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले, ‘‘गेल्या अनेक वर्षांनंतर पंजाबला प्रामाणिक मुख्यमंत्री मिळणार आहे, याचा आनंद वाटतो. ते (मान) स्वतः प्रामाणिक असल्याने, त्यांचे सरकारही प्रामाणिकपणे काम करेल, असा विश्‍वास आहे.’’

‘‘नागरिकांकडून मिळालेला प्रत्येक पैसा हा राज्यातील नागरिकांसाठीच खर्च करण्यात येईल. नागरिकांना आम्ही जी आश्‍वासने दिली आहेत, ती सर्व आश्‍वासने पाळण्यात येतील. ‘आप’चा कोणीही आमदार किंवा नेता चुकीच्या गोष्टी करताना आढळला, तर त्याला तुरुंगात टाकण्यात येईल,’’ असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक नागरिक मुख्यमंत्री

भगवंत मान हे येत्या १६ रोजी शहीद भगतसिंग यांच्या खटकडकला या गावात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यावेळी केवळ मानच नाही, तर राज्यातील प्रत्येक जण मुख्यमंत्री होईल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले, या शपथविधी समारंभासाठी येण्याचे निमंत्रण त्यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT