नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर केला आहे. देशाच्या अर्थसंकल्पातील (Budget 2022) तरतूदींचा देशातील सामान्य जनतेच्या खिशावर परिणाम होत असतो, त्यामुळे बजेटकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं असतं. एकीकडे गेली दोन वर्षे देश कोरोनाच्या संकटामुळे देश होरपळून निघालेला असताना आर्थिक आघाड्यांवर मोठ्या समस्यांना दोन हात करावे लागत आहेत. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही मोठ्या घोषणा केल्या आहेतहे बजेट सामान्यांसाठी झिरो बजेट (Union Budget) ठरलं असल्याची टीका विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत या बजेटबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. या बजेटमधून अक्षरश: 'शून्य' मिळाला असल्याचं ठाम मत त्यांनी मांडलंय. त्यांनी आपल्या ट्विटची सुरुवातच 'M0di G0vernment’s Zer0 Sum Budget!' म्हणजेच 'मोदी सरकारचे झीरो सम बजेट' अशी केली आहे. या बजेटमधून पगारी नोकरदार वर्गाला, मध्यम वर्गाला, गरीब आणि वंचित घटकांना, तरुणांना, शेतकऱ्यांना आणि लहान आणि मध्यम उद्योगांना काहीच मिळालं नसल्याची खरमरीत टीका त्यांनी केली आहे.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता यावर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर प्रतिक्रिया देत सरकारवर जोरदार टीका केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर यावर ट्वीट करत आपले मत व्यक्त केले आहे. त्यात त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. बेरोजगारी आणि महागाईने त्रस्त सर्वसामान्यांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कोणतीही विशेष तरतुद करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प कोणत्याही बाजूने सामान्यांच्या बाजूने नाहीये, अशी बोचरी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.