Sakal Money sakal
Sakal Money

Sakal Money : महागाईवर मात करणारी गुंतवणूक गरजेची ; ‘सकाळ मनी’ कार्यक्रमात शेअर बाजार आणि कमोडिटी गुंतवणूकतज्ज्ञांचा सल्ला

सध्या भारतीय शेअर बाजार आणि सोने-चांदी प्रचंड तेजीत आहेत, त्यामुळे नेमके काय करावे, असा प्रश्न सर्वसामान्य गुंतवणूकदारांना पडत आहे. मात्र, जेव्हा शेअर बाजार, सोने-चांदी यांचे भाव अतिवेगाने वाढत असतील, तेव्हा थोडे सावध होण्याची गरज आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सध्या भारतीय शेअर बाजार आणि सोने-चांदी प्रचंड तेजीत आहेत, त्यामुळे नेमके काय करावे, असा प्रश्न सर्वसामान्य गुंतवणूकदारांना पडत आहे. मात्र, जेव्हा शेअर बाजार, सोने-चांदी यांचे भाव अतिवेगाने वाढत असतील, तेव्हा थोडे सावध होण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत सावधपणे आणि अभ्यासपूर्वक गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कोणतीही गुंतवणूक करताना त्यातून आपल्याला महागाईवर मात करता येईल इतका परतावा मिळेल ना, हे पाहणे महत्त्वाचे आहे, असा सल्ला गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी शनिवारी येथे दिला.

अर्थ-उद्योग-गुंतवणूक क्षेत्राला वाहिलेल्या ‘सकाळ मनी’या मासिकाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. या द्विवर्षपूर्तीनिमित्ताने वाचक-गुंतवणूकदारांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी महेश पाटील आणि पीएनजी अँड सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘सकाळ मनी’चे संपादक मुकुंद लेले यांनी प्रास्ताविकात ‘सकाळ मनी’मागची भूमिका स्पष्ट करताना, समाजात अर्थसाक्षरतेचा प्रसार करण्याची मोठी गरज असल्याचे नमूद केले.

शेअर बाजार आणि सोने-चांदीच्या तेजीमागची कारणे काय आहेत, तेजीची झेप कुठवर असेल, तसेच आता गुंतवणूक करावी का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यावेळी नागरिकांना मिळाली. ‘सकाळ मनी’च्या २५व्या अंकाचे प्रकाशन पाटील, मोडक आणि ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमादरम्यान करण्यात आले.

पाटील म्हणाले, ‘‘आपण गुंतवणूक करतो, ती आपली संपत्ती वाढावी म्हणून. त्यामुळे ती महागाईवर मात करू शकेल इतका परतावा देणारी, आपल्या पैशाचे मूल्य वाढविणारी असणे गरजेचे आहे. भविष्यातील महागाईचा दर, आपले राहणीमान, आर्थिक उद्दिष्टे, जोखीम घेण्याची क्षमता या सर्वांचा विचार करून गुंतवणुकीसाठीचे पर्याय निवडणे गरजेचे आहे. याशिवाय सुरक्षितता, तरलता, करबचत हे निकषही पाहणे आवश्यक आहे.

सध्या शेअर बाजार तेजीत असला तरी सर्वसामान्यांसाठी म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय आहे. यात अनेक वैविध्यपूर्ण शेअरमधील गुंतवणुकीचा लाभ मिळतो. दीर्घकालीन गुंतवणूक उत्तम परतावा देते आणि त्यातूनच संपत्तीनिर्मिती होते. यापुढच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणारे देशांतर्गत उत्पादन क्षेत्र, डिजिटल विकास, खासगी बँका व बिगरबँकिंग वित्तीय संस्था आणि हौसेखातर घेतल्या जाणाऱ्या वस्तूंची वाढती मागणी या संकल्पनांवर आधारित क्षेत्रात गुंतवणूक करणे लाभदायी ठरेल, असे वाटते. आपली अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. तरुणांची सर्वाधिक संख्या, ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेतील आघाडी, स्टार्ट-अप अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधांवरील खर्च, आयटी क्षेत्रात देशाचे निर्माण झालेले प्राबल्य यामुळे आपण जगातील बलाढ्य अर्थव्यवस्थेलाही मागे टाकू शकू. मात्र, त्यासाठी दीर्घ कालावधी लागेल.’’

मोडक म्हणाले, ‘‘सोन्याला सर्व राजसत्तांची गॅरंटी आहे. त्यामुळे सर्व कोलमडले तरी सोने अबाधित राहणार आहे. मात्र, त्याला चलनाचे मूल्य येणार नाही. आपल्या देशात सोने हे दागिने स्वरूपात मोठ्या प्रमाणात असल्याने ते कायम टिकून राहणार आहे आणि त्याचे मूल्य वाढतच जाणार आहे. त्यामुळे सोन्याकडे संपत्ती म्हणून बघा. आर्थिक अडचणींवरील सर्वांत शेवटचा उपाय म्हणून सोन्याचा वापर केला जातो. सध्या सोन्याच्या बाबतीत अर्थशास्त्राचे नियम मोडीत निघाले आहेत. अस्थिर जागतिक परिस्थितीमुळे अचानक मागणी वाढल्याने सोने महागले आहे. असे अचानक वेगाने भाव वाढलेले असताना सावध राहणे गरजेचे आहे.’’

आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडाचे विभागीय व्यवस्थापक (गुंतवणूकदार साक्षरता) शैलेंद्र दीक्षित, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी (मुंबई) हेही यावेळी उपस्थित होते. ‘सकाळ मनी’मध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मंदार कुलकर्णी यांनी ‘अर्थ’पूर्ण सूत्रसंचालन केले. प्राची गावस्कर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

Mumbai Local News: मुंबईकरांनो लक्ष द्या, आज तीन तासांचा ब्लॉक!

Maharashtra Winter Update: थंडीपासून जरा जपूनच, निच्चांकी तापमान 10 अंशांवर; राज्य गारठलं!

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

SCROLL FOR NEXT