गेल्या काही काळापासून अर्थिक अडचणीत असलेले उद्योगपती अनिल अंबानी आता रिलायन्स जय प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड (RJPPL) ही नवीन उपकंपनी स्थापन करत रिअल इस्टेट मार्केटवर आपले लक्ष केंद्रित करत आहे.
अंबानी यांनी या कंपनीच्या माध्यमातून देशात बांधकाम क्षेत्रातील होणारा विकास आणि मोदी सरकारने आणलेल्या स्मार्ट सिटी यासारख्या योजनांमुळे या क्षेत्राला पुढील काळात चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. अशात अनिल अंबानीही याचा फायदा घेत आपली विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी प्रयत्नशील असतील.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने 12 ऑगस्ट रोजी रिलायन्स जय प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड (RJPPL) या नवीन उपकंपनीच्या स्थापनेची घोषणा केली. जी रिअल इस्टेट क्षेत्रात आपले काम वाढवणार आहे.
11 ऑगस्ट रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरची किंमत 1.80 टक्क्यांनी घसरून 225.85 रुपयांवर बंद झाली. कंपनीचे बाजार भांडवल 8,946.62 कोटी रुपये आहे.
नवीन उपकंपनी रिलायन्स एनर्जी लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी म्हणून स्थापन करण्यात आली, जी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची उपकंपनी आहे.
ही कंपनी प्रामुख्याने नागरीकरण, रस्ते बांधकाम, निवासी आणि व्यावसायिक इमारतींचे बांधकाम यात काम करते.
भारतात गेल्या काही काळापासून रिअल इस्टेट क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळेच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने याचा फायदा घेत निव्वळ नफा वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
दरम्यान शहरी गरिबांना परवडणारी घरी मिळावी यासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री आवास योजना 2.0 आणली आहे. याचबरोबर सरकारने देशात 100 स्मार्ट सिटी तयार करण्यासाठी 48,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 2023 मध्ये, 1.93 लाख कोटी किमतीच्या 7,900 प्रकल्पांसाठी करार करण्यात आले. त्यासह देशात 2025 पर्यंत 2 लाख किलोमिटर रस्ते निर्मिती होणार आहे.
सरकारच्या वरील सर्व योजना पाहता आणि बांधकाम क्षेत्रासाठी उत्तम असलेला येणारा काळ पाहता नव्या कंपनीच्या माध्यमातून अंबानींचा यामधून फायदा उचलण्याचा प्रयत्न असेल.
अमेरिकेच्या व्हार्टन स्कूलमधून एमबीए केलेले ६४ वर्षीय अनिल अंबानी हे प्रसिद्ध उद्योगपती धीरूभाई अंबानी यांचे धाकटे पुत्र आहेत. 2008 मध्ये अंबनी जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. पण उद्योगात सततच्या धक्क्यामुळे गेल्या काही काळात त्यांची अर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी त्यांनी दिवाळखोरीही जाहीर केली होती. पण आता नव्या कंपनीच्या माध्यमातून ते यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.