tata group esakal
Sakal Money

Tata Group: टाटाचा शेअर मार्केटमध्ये जलवा! 5 दिवसांत तब्बल 20 हजार कोटींची कमाई

tcs shares jump : टाटा स्टीलच्या शेअर्संनी गेल्या ५२ आठवड्यांमधील उच्चांक गाठला आहे. बीएसईवर टाटा स्टीलच्या शेअर्सची किंमत १५६.१० रुपये प्रति शेअर इतकी झाली आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- टाटा स्टीलच्या शेअर्संनी गेल्या ५२ आठवड्यांमधील उच्चांक गाठला आहे. बीएसईवर टाटा स्टीलच्या शेअर्सची किंमत १५६.१० रुपये प्रति शेअर इतकी झाली आहे. कंपनीचे एकूण बाजार मूल्य १,९३, ६८०.६१ कोटी इतके आहे. गेल्या ३ महिन्यात कंपनीने शेअर्सधारकांना १९ टक्क्यांचा फायदा करुन दिला आहे. तर, गेल्या तीन वर्षांमध्ये १११ टक्के लाभ मिळवून दिलाय. पाच वर्षात शेअर्सची किंमती तब्बल २०५ टक्कांनी वाढली आहे.

दुसरीकडे, टीसीएसचे (TCS) गेल्या आठवड्याभरात १९, ८८१.३९ कोटींनी मार्केट कॅप वाढले आहे. त्यामुळे टीसीएसचा एकूण मार्केट कॅप १४, ८५, ९१२.३६ झाला आहे. टाटाच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होतेय. पाच दिवसात कंपनीला तब्बल २० हजार कोटींचा लाभ झाला आहे.

टाटा स्टीलने २४ मे २००१ पासून शेअर्सधारकांना २९ वेळा डिव्हिडंट दिला आहे. गेल्या बारा महिन्यापूर्वी कंपनीने प्रति शेअर्स ३.६० रुपयांचा डिव्हिडंट दिला आहे. सध्या शेअर्सची किंमत १५५. १५ रुपये आहे. कंपनीने २०२२ मध्ये सर्वाधिक ५१ रुपये प्रति शेअर्स डिव्हिडंट दिल्याची घोषणा केली होती. टाटा स्टील कंपनीने २८ जुलै २०२२ नंतर शेअर्सची किंमत स्प्लिट केली होती. तेव्हा शेअर्सची किंमत १० रुपयांवर १ रुपये करण्यात आली होती.

कंपनीने डिसेंबर २०२३ मध्ये ५२२.१४ कोटींचा फायदा झाल्याचे जाहीर केले होते. युरोपातील अस्थिर परिस्थितीमुळे त्याच्या मागील वर्षात कंपनीला २५०१.९५ कोटींचा तोटा झाला होता. पण, त्यानंतर २०२३ पासून शेअर्संनी चांगली कामगिरी केली आहे.

टाटा स्टीलची स्थापन आशियातील पहिली खाजगी स्टील कंपनी म्हणून १९०७ मध्ये झाली होती. त्यानंतर भारतातील पहिली इंडस्ट्रियल सिटी म्हणून जमशेदपूरचा विकास झाला होता. सध्या टाटा स्टील ही जगातील प्रमुख स्टील कंपनी आहे. कंपनीने FY21 मध्ये ९१,०३७ कोटी रुपये बाजार मूल्य नोंदवले होते.

महत्त्वाची सूचना: शेअर्संच्या सध्याच्या स्थितीबाबत याठिकाणी माहिती देण्यात आली आहे. शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्याचा सल्ला देण्यात आलेला नाही. वरील माहिती प्रसिद्ध असलेल्या विश्लेषणावर आधारित आहे. त्यामुळे शेअर्सच्या खरेदी-विक्रीबाबत निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

US Election : अमेरिकेला मिळणार पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष? कमला हॅरिस यांच्या गावी विजयाची उत्कंठा

SCROLL FOR NEXT