एटीएम शोल्डर सर्फिंग स्कॅम Esakal
Banking

ATM Card Scam: एटीएममधून पैसे काढताय तर सावधान! PIN टाकताच खात्यातील पैसे होतील लंपास

काही स्कॅमर्स हे तुमच्यावर कायम नजर ठेवून असू शकतात. तुमच्या आसपास राहून हे स्कॅमर्स तुमची खाजगी माहिती चोरून तुम्हाला कंगाल करू शकतात. त्यामुळेच सावधगिरी बाळगणं गरजेचं बनलं आहे

Kirti Wadkar

समजा तुम्ही ATMमधून पैसे काढण्यासाठी गेलात आणि पिन टाकताच तुमच्या खात्यातील सगळेच पैस उडाले तर. होय असं होवू शकतं. तुमची एक छोटीशी चुक किंवा निष्काळजीपणा हा काही स्कॅमर्ससाठी फायद्याचा ठरू शकतो. Beware at ATM Shoulder you may loose money by Shoulder Surfing

काही स्कॅमर्स हे तुमच्यावर कायम नजर ठेवून असू शकतात. तुमच्या आसपास राहून हे स्कॅमर्स तुमची खाजगी माहिती चोरून तुम्हाला कंगाल करू शकतात. त्यामुळेच सावधगिरी बाळगणं गरजेचं बनलं आहे.

तुम्ही ATM मधून पैसे काढताना किंवा एखाद्या ठिकाणी कार्डने पेमेंट करताना ATM Pin चा वापर करतात.

हीच संधी साधून हे स्कॅमर्स Scammers तुमच्या खात्यातील सर्व पैसे काढू शकता. या स्कॅमला शोल्डर सर्फिंग असं म्हटलं जातं आहे.

शोल्डर सर्फिंग स्कॅममध्ये तुमची गोपनिय माहिती केवळ तुमच्या हालचालींवर नजर ठेवून मिळवली जाते. खास करून ATM मधून पैसे काढत असताना किंवा मोबाईलच्या मदतीने पेमेंट करतानाही एखादी व्यक्ती तुमचा पिन, पासवर्ड तसंच युजरनेम किंवा इतर खाजगी माहिती चोरू शकते आणि तिचा चुकीचा वापर करू शकते.

हे देखिल वाचा-

काय आहे शोल्डर सर्फिंग What is shoulder surfing scam

शोल्डर सर्फिंग स्कॅममध्ये काही टोळ्या थेट माणसांच्या गर्दीत किंवा ATM च्या आसपास वावरत असतात. त्या तुमच्या अगदी जवळ येऊन उभ्या राहतात. त्यांची तुमच्या फोनवर नजर असते. अनेकदा फोनमध्ये तुम्ही भरत असलेले डिटेल्स ते रेकॉर्ड करतात किंवा चोख लक्षात ठेवतात. ज्याचा ते दुरुपयोग करु शकतात.

तसंच खास करून अशा व्यक्ती ATM मध्ये एखाद्याला फसवण्याच्या तयारीत संधीची वाट पाहत असतात. अनेकदा ATM एखाद्याला मदत करण्याची संधी किंवा नकळत सजहपणे अगदी जवळ येऊन उभं राहणं आणि पिन जाणून घेणं अशा युक्त्या या व्यक्ती करत असतात.

तसंच बँकेचा फार्म भरत असताना किंवा बँकेतील इतर कागदी व्यवहार करत असताना त्या तुमच्या खात्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. सर्व माहिती मिळवून ते तुमच्या खात्यातील पैसे काढून घेऊ शकतात.

ही खबरदारी घ्या आणि शोल्डर सर्फिंग स्कॅमपासून दूर रहा

ATM मध्ये कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मदत घेणं प्रकर्षाने टाळा. यासाठी तुम्ही बँक कर्मचाऱ्याची मदत घेऊ शकता.

तसंच ATM मध्ये पिन टाकत असताना तुमच्या मागे उभं राहून कुणी डोकावत तर नाही ना याची काळजी घ्या. ATM पिन वरचेवर बदलतं राहणं हा देखील एखाद्या स्कॅमपासून वाचण्याचा एक चांगला उपाय आहे.

हे देखिल वाचा-

ATM मध्ये पिन टाकत असताना किपॅडवर आपला दुसरा हात ठेवा. यामुळे कॅमेरा किंवा इतर कोणत्याही मार्गाने पिन चोरी होण्याचा धोका टळेल.

या शिवाय फोन किंवा कार्ड पेमेंट करताना देखील दुकानदाराला तुमचा पिन न सांगता तुम्ही तो पिन टाका. यावेळी शेजारील व्यक्ती पाहू शकणार नाही याची काळजी घेऊन पिन टाकणं गरजेचं आहे.

तसचं सार्वजनिक ठिकाणी ऑनलाईन पेमेंट किंवा इतर महत्वाची माहिती फोनमध्ये भरताना खबरदारी बाळगणं गरजेंचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Candidate List: माणमध्ये गोरेंच्या विरोधात नवा उमेदवार, पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर

Swapna Patkar: संजय राऊतांवर गंभीर आरोप करणाऱ्या स्वप्ना पाटकर निवडणुकीच्या रिंगणात; 'या' मतरसंघातून दाखल करणार अर्ज

Alzheimer's Disease : खुशखबर! अल्झायमरवर इलाज सापडला, पुण्याच्या शास्त्रज्ञांनी केला चमत्कार; असा लागला शोध!

Assembly Election: पवारांची ५७ वर्षांची परंपरा युगेंद्र पवार सुद्धा पाळणार! काय आहे कान्हेरी मारुतीचे बारामतीच्या निवडणुकीशी कनेक्शन?

Latest Maharashtra News Updates : चोपड्यातून ठाकरे गटाचा उमेदवार बदलला

SCROLL FOR NEXT